Gautam Gambhir Poses With Sri Lanka Flag esakal
क्रीडा

VIDEO : 'सुपरस्टार टीम' म्हणत गंभीरनं फडकावला लंकेचा झेंडा!

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 Sri Lanka Vs Pakistan : श्रीलंकने फायनलमध्ये पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत आशिया कपच्या विजेतेपदाचा षटकार मारला. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पाकिस्तानचा सर्व संघ 20 षटकात 147 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रीलंकेने पाकिस्तानला मात दिल्यानंतर फक्त श्रीलंकेतच नाही तर भारतात देखील आनंदाचे वातावरण आहे. श्रीलंकेच्या बाऊन्स बॅकची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर, समोलोचक, भाजपचा खासदार गौतम गंभीर देखील श्रीलंकेच्या संघावर जाम खूष होता. त्याने तर श्रीलंकेचा झेंडा हातात घेत आपल्या भावना मैदानावरच व्यक्त केल्या.

श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लंकेच्या चाहत्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली. आशिया कपच्या सुरूवातीला श्रीलंका विजेतेपदाची दावेदार नव्हती. मात्र त्यांना जोरदार मुसंडी मारत विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यानंतर श्रीलंकेच्या चाहत्यांनी जल्लोष केला. या जल्लोषात समालोचक गौतम गंभीर देखील सामिल झाला. त्याने श्रीलंकेचा झेंडा हातात घेत तो श्रीलंकेच्या चाहत्यांना दाखवला. लंकेच्या चाहत्यांच्या आनंद गगनात मावत नव्हता. हा व्हिडिओ शेअर करत गौतम गंभीरने त्याला 'सुपरस्टार टीम... खरे हक्कदार! अभिनंदन श्रीलंका.' असे कॅप्शन दिले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली होती. पाकिस्तानच्या प्रभावी माऱ्यासमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद 58 अशी झाली. मात्र त्यानंतर भानुका राजापक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावांची दमदार खेळी केली. त्याला हसरंगाने 36 धावा करून चांगली साथ दिली. या जोरावर श्रीलंकेने 20 षटकात 170 धावांपर्यंत मजल मारली.

लंकेचे हे 171 धावांचे आव्हान पार करताना पाकिस्तानने देखील 2 बाद 93 अशी चांगली सुरूवात केली होती. मात्र शेवटच्या 10 षटकात श्रीलंकेच्या गोलंदाजांना पाकिस्तानला धक्के देण्यास सुरूवात केली. प्रमोद मधुशानने 34 धावात 4 तर वानिंदू हसरंगाने 27 धावात 3 विकेट घतेल्या. लंकेने पाकिस्तानचा डाव 147 धावात गुंडाळला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जवळपास 20 हजार पाकिस्तानी चाहते होते तर काही हजारच श्रीलंकेचे चाहते आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Cancer Symptoms : खळबळजनक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल १४ हजारांहून अधिक महिलांमध्ये आढळली 'कॅन्सर'सारखी लक्षणे

कपिल शर्माही खलिस्तानींच्या निशाण्यावर; दोन दिवसांपूर्वी उघडलेल्या कॅफेवर गोळीबार, 'या' संघटनेने घेतली जबाबदारी

Latest Maharashtra News Updates : नाशिकच्या गोदावरी नदीत एक जण गेला वाहून

Video: आई शप्पथsssss असं रिपोर्टिंग तुम्ही पाहिलं नसेल! गुरुग्राममध्ये पावसाचा कहर, त्यात या पठ्ठ्याला आली लहर मग...

Thane News: सफाई कर्मचाऱ्यांना नवी ओळख देण्याचा निर्धार, गणवेश बदलण्याचा निर्णय, पालिकेची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT