Gautam Gambhir Statement About MS Dhoni esakal
क्रीडा

Gautam Gambhir : अखेर गंभीरच्या तोंडून धोनीचं सत्य आलं बाहेर; म्हणाला 2011 WC फायनमध्ये 97 धावांवर असताना...

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir Statement About MS Dhoni : भारत आणि श्रीलंका यांच्यात 2011 मध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनचे किस्से तब्बल 12 वर्षानंतरही अजून सांगितले जात आहे. या फायनल सामन्यात धोनीचा विनिंग षटकार, युवराजला खाली पाठवणं, गंभीरच्या 97 धावांचे योगदार झाकोळलं जाण याबाबत बरीच चर्चा झाली आहे.

मात्र सध्या सुरू असलेल्या भारत - श्रीलंका मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यादरम्यान, स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात गौतम गंभीरने कोणाला माहिती नसलेली महेंद्रसिंह धोनीबाबतची एक स्टोरी सांगितली.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या 2011 च्या फायनलमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 275 धावांचे आव्हान ठेवले होते. महेला जयवर्धनेने शतकी खेळी केली होती. लंकेच्या 275 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला विरेंद्र सेहवागच्या रूपात सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर पहिला धक्का बसला होता.

त्यानंतर काही षटकातच लसिथ मलिंगाने सचिन तेंडुलकरला 18 धावांवर बाद केले. भारताचे दोन्ही अनुभवी फलंदाज माघारी गेल्यानंतर सलामीवीर गौतम गंभीरने युवा विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचली. विराट बाद झाल्यानंतर गंभीरने धोनीसोबत 109 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली.

गौतम गंभीर 97 धावांवर खेळत होता. तो भारताकडून वर्ल्डकप फायनलमध्ये शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरण्याच्या उंबरठ्यावर उभार होता. मात्र थिसारा परेराला पुढे सरसावत फटका मारण्याच्या नादात गंभीर बाद झाला होता. गंभीर ज्यावेळी बाद झाला त्यावेळी त्याच्यासोबत कर्णधार महेंद्रसिंह धोनी बॅटिंग करत होता.

गौतम गंभीरने तब्बल 22 वर्षानंतर ज्यावेळी तो शतकाच्या जवळ होता त्यावेळी धोनी आणि त्याचे काय संभाषण झाले याबाबत वक्तव्य केले. गौतम गंभीर म्हणाला की, 'महेंद्रसिंह खूप सपोर्टिव्ह होता. त्याला मी शंभर करावं असं वाटत होते. तो कायम मी शतक ठोकावं असं वाटायचं. त्याने मला षटकांच्या मध्ये सांगितलं होतं की तुझे शतक पूर्ण करून घे कोणतीही घाई करू नकोस जर गरज लागलीच तर मी धावांची गती वाढवेन.'

(Sports Latest News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT