rahuldravid and rohit sharma  
क्रीडा

Team India: '... ब्रेक घेणे थांबवा' विश्वविजेत्या खेळाडूने रोहित-द्रविडला फटकारले

टी-20 विश्वचषकानंतर लगेचच द्रविडने घेतला होता ब्रेक....

Kiran Mahanavar

Team India : टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडियाची पुढची मोठी कसोटी वनडे वर्ल्डकपमध्ये असणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार आहे.त्यासाठी फक्त 10 महिने बाकी आहेत. पण या स्पर्धेत भारतीय संघात कोणते खेळाडू अद्याप निश्चित झालेले नाहीत.

बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारत निश्चितपणे पूर्ण ताकदीचा संघ घेऊन उतरला. मात्र गोलंदाजीत तसे नव्हते. त्यामुळे भारताने ही मालिका गमावली. आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीबद्दल बरेच काही बोला आहे. त्याने रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना वारंवार ब्रेक घेणे थांबवावे आणि आपली ताकद ओळखून विश्वचषकाची तयारी सुरू करावी असा सल्ला दिला आहे.

स्टार स्पोर्ट्स शोमध्ये गौतम गंभीर म्हणाला की, 'सर्वप्रथम तुम्हाला तुमची ताकद ओळखावी लागेल. गेल्या 1 वर्षात संघात सातत्याने बदल केले आहेत. मग ते वनडे असो वा टी-२०. अनेक खेळाडूंवर प्रयत्न केले गेले. आमची कधीच सेटल टीम नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्णधार आणि प्रशिक्षक असल्याने रोहित शर्मा आणि राहुल द्रविड वारंवार विश्रांती घेऊ शकत नाहीत. ते देखील जेव्हा विश्वचषक अगदी जवळ असताना. विराट कोहली, रोहित शर्मा आणि संघातील प्रमुख खेळाडूंनी आता अधिकाधिक क्रिकेट एकत्र खेळायला हवे. हे देखील पुन्हा पुन्हा ब्रेक घेऊ शकत नाही.

द्रविडने टी-20 विश्वचषकानंतर घेतली विश्रांती -

टी-20 विश्वचषकानंतर लगेचच भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यातील ब्रेकमुळे राहुल द्रविड संघासोबत गेला नाही. व्हीव्हीएस लक्ष्मणने त्याच्या अनुपस्थितीत प्रशिक्षकाची भूमिका बजावली.

श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत विराट ब्रेकवर

सध्या विराट कोहली ब्रेकवर आहे. 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत तो संघाचा भाग नाही. त्याचवेळी रोहित शर्माची दुखापत पूर्णपणे सावरलेली नाही. त्यामुळेच त्याची टी-20 मालिकेसाठीही निवड झाली नाही. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान हार्दिक पांड्या संघाचा भाग नव्हता. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी अद्याप दुखापतीतून सावरलेले नाहीत. त्याच वेळी, दीपक चहर देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंजत आहे. भारताने दीर्घकाळ स्थिर संघासोबत एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नाही, असे म्हणणे पुरेसे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT