Gautam Gambhir ESAKAL
क्रीडा

Gautam Gambhir : शाहरूख खान तर फॅमिली... KKR वासी झाल्यानंतर गौतम गंभीरचं ट्विट

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतला असून तो आता संघाच्या व्यवस्थापनाचा भाग आहे. गौतम गंभीरने केकेआरला दोनवेळा आयपीएल जिंकून दिली होती. आता तो या संघ व्यवस्थापनात परतला असून तो घरवापसीने जाम खूश आहे. त्याने एक ट्विट देखील केले.

गौतम गंभीर एका ट्विटला प्रतिक्रिया देताना म्हणाला, 'हे खूप स्वाभाविक नाही का? तो माझं कुटुंब आहे आणि केकेआर हा माझ्यासाठी भावनिक विषय आहे. केकेआरमध्ये परत आल्याने मी खूप उत्साही आहे.'

गौतम गंभीरने केकेआरसाठी दोन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. 2012 आणि 2014 मध्ये केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावलं. आता तो आयपीएल 2024 मध्ये संघ व्यवस्थापनाचा भाग असणार आहे. गौतमसोबतच श्रेयस अय्यर देखील केकेआरचा कर्णधार म्हणून परतला आहे. गेल्या वर्षी श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नव्हता. त्यावेळी नितीश राणाकडे केकेआरच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT