German Tennis Player Alexander Zverev suspended eight week  esakal
क्रीडा

अंपायरच्या खुर्चीवर रॅकेट आपटणाऱ्या झ्वेरेव्हवर निलंबनाची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मॅक्सिकन ओपनच्या पुरूष एकेरी स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव्हने (Alexander Zverev) रागाच्या भरात आपली टेनिस रॅकेट अंपायरच्या खुर्चीवर आपटली होती. आता पुरूष टेनिस (Tennis) संघटनेने त्याच्यावर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला आठ आठवड्यासाठी निलंबित (Suspension) केले आहे. या प्रकारानंतर मॅक्सिकन ओपनमधूनही (Mexican Open) त्याला तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

झ्वेरेव्हला अंपायरला अपशब्द वापरल्याबद्दल 20 हजार डॉलर आणि खिलाडूवृत्ती न दाखवल्याबद्दल 20 हजार डॉलरचा दंड झाला होता. तसेच त्याच्या प्राईज मनीमधून 31 हजार डॉलर देखील कापून घेण्यात आले होते. त्याला मॅक्सिकन ओपमध्ये सिंगल्स आणि डबल्स सामन्यातून मिळालेले पॉईंट्सपासून देखील हात धुवावे लागले होते. दरम्यान, एटीपीने आपल्या अहवालात झ्वेरेव्हची वागणूक ही अत्यंत वाईट होते. त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त 25 हजार डॉलरचा फाईन लावण्यात आला होता.

आता एटीपीने झ्वेरेव्हवर निलंबनाची कारवाई करत त्याला मोठा धक्का दिला आहे. याचबरोबर एटीपीने जर्मन टेनिसपटूसमोर एक अटही ठेवली आहे. 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत त्याच्यावर कोणतेही अखिलाडूवृत्ती दर्शवणारे वर्तनावरून कारवाई होता कामा नये. तोपर्यंत त्याच्यावर करण्यात आलेली दंडाची आणि निलंबनाचा कारवाई रोखून धरण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT