football in Maharashtra marathi news  
क्रीडा

Football News: महाराष्ट्राच्या खेडोपाडी फुटबॉल रुजावा म्हणून 'या' बलाढ्य देशाने घेतला पुढाकार

सकाळ ऑनलाईन टीम

Maharashtra Football Team : राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी आणि क्रीडा व युवा सेवा संचालनालय यांच्यामध्ये करार करण्यात आला असून या माध्यमातून राज्यस्तरावर फुटबॉल क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मनी येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एक प्रकारे राज्यात फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी जर्मनीने हा पुढाकार घेतला आहे.

या अंतर्गत राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यामध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल संघातील खेळाडूंनी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेले फुटबॉल खेळाडू यासाठी पात्र राहणार असून या योजनेअंतर्गत फुटबॉल खेळासाठी योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधांना चालना देत राज्यातील फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षक देण्याची जबाबदारी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक जर्मनी व क्रीडा व युवा सेवा संचालनालय यांच्या वतीने घेण्यात आली आहे. या स्पर्धेकरीता बुलडाणा जिल्ह्यातील 14 वर्षाखालील जास्तीत जास्त मुलांच्या संघानी सहभाग नोंदवावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धे संदर्भात क्रीडा संघटनांची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली असून यात सविस्तर चर्चा केल्या जाणार आहे. ही स्पर्धा बुलडाणा जिल्ह्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची नियोजन करण्यात आले आहे. यासाठी फुटबॉल खेळाडूनी आपली नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधावा.

- गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT