Glenn Maxwell News Marathi 
क्रीडा

पार्टी नडली मॅक्सवेलची जिरली, भाऊ थेट हॉस्पिटलमध्ये! तर आणखी एका स्टार खेळाडूची प्रकृती खालावली

Kiran Mahanavar

Glenn Maxwell News : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलबाबत सोमवारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया आणि इतर रिपोर्ट्सनुसार, अॅडलेडमधील एका पबमध्ये पार्टी केल्यानंतर मॅक्सवेलची तब्येत बिघडली. त्यानंतर थेट त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका स्टार खेळाडूला कोविडची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मॅक्सवेलची तब्येत का बिघडली?

अहवालांवर विश्वास ठेवला तर, ग्लेन मॅक्सवेलने पबमध्ये खूप मद्यपान केले. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणतेही अपडेट मिळालेले नाही. मात्र ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या वृत्तानुसार, मॅक्सवेललाही उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही अहवालांमध्ये, ट्रॅव्हिस हेडला कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियन संघाचे महत्त्वाचे भाग आहेत.

टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, ग्लेन मॅक्सवेल सोबत ही घटना 19 जानेवारीच्या रात्रीची आहे. अॅडलेडमधील एका पबमध्ये मॅक्सवेल ब्रेट लीच्या सिक्स अँड आउट बँडचा परफॉर्मन्स पाहत होता. त्यावेळी त्याने मद्यपान केले असावी. त्यानंतरच त्यांची प्रकृती खालावल्याचे बोलले जात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाही या प्रकरणाची चौकशी करत आहे. अॅडलेडमधील पार्टीनंतर मॅक्सवेलला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आल्याचे 7 न्यूजने म्हटले आहे. त्याचे काय झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

तर सोमवारी द एजने वृत्त दिले की, ट्रॅव्हिस हेडला कोविडची लागण झाली आहे. याचा अर्थ ऑस्ट्रेलियन संघासाठी सध्या सर्व काही ठीक नाही. याशिवाय उस्मान ख्वाजालाही वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जबड्याला दुखापत झाली होती. सध्या उत्कृष्ट फॉर्मात असलेला कांगारू संघ या अडचणींचा कसा सामना करतो हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विहीर ढासळली! मलब्याखाली दबून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू; संभाजी नगरच्या सिल्लोडमधील घटना

Latest Marathi News Live Update : जसं एपस्टीनला मारलं, तसंच खरातला मारतील- नाना पटोले

Solar Panel Benefits : घरी सोलर पॅनल बसवल्यास होतात 10 फायदे; विजबिल झीरो, सरकार स्वतः देत आहे ७८ हजार रुपये

MS Dhoni: धोनीचं साम्राज्य आता संपणार! विराट-रोहित आज मोडणार 'थाला'चा सर्वात मोठा रेकॉर्ड!

Vidarbha News: भंडारा शहरात १२.६५ लाखांची एमडी जप्त ;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीचा नागपूरसोबत संबंध उघड

SCROLL FOR NEXT