Glenn Maxwell On Viral Tamil Language Marriage Invitation Card Sakal
क्रीडा

काय तुझ्या माहेरची माणसं; भारताचा होणारा जावई मॅक्सवेल चिंतेत

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक आठवडाभर चालणाऱ्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम सोशल मीडियावर लिक झाल्यामुळे आता सुरक्षा व्यवस्थेवर अधिक भर द्यावा लागणार आहे. मॅक्सवेल आणि त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman)27 मार्चला विवाह बंधनात अडकणार आहेत. हा विवाह सोहळा पारंपारिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. (Glenn Maxwell Reacts On Viral Tamil Language Marriage Invitation Card)

मॅक्सवेलला IPL मधील एका सहकाऱ्याकडून लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची बातमी दिली. अभिनेत्री कस्तुरी शंकर हिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन मॅक्सी आणि विनीची तमिळ भाषेतील लग्न पत्रिका शेअर केली होती. अल्पावधीत ही लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली.

cricket.com.au ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॅक्सवेलनं व्हायरल लग्नपत्रिकेवर भाष्य केले. ही गोष्ट चांगली नाही. आयुष्यातील मोठ्या क्षणासाठी आता मला अतिरिक्त सुरक्षेची तयारी करावी लागले. हा क्षण वैयक्तीक असल्यामुळे मोजक्या मंडळींपर्यंतच गोष्ट मर्यादीत ठेवायची होती. पण भारतीय नातेवाईक खूपच उत्साही झाले आणि त्यांनी मित्रांसोबत लग्नपत्रिका शेअर केली, असेही मॅक्सवेल म्हणाला. काही क्षणात सर्व मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रम जाहीर झाला. अनेक जण मला ट्विट करु लागले. त्यावेळी मला क्षणभर धक्काच बसला होता, असेही तो म्हणाला. त्याची ही प्रतिक्रिया भारत माहेर घर असलेल्या विनीसाठी काय तुझ्या माहेरची माणसं, असचं काहीतरी सूचित करणारी आहे.

मॅक्सवेल श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत व्यस्त

मॅक्सवेल सध्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत व्यस्त आहे. नुकतीच त्याने 25 चेंडूत 39 धावांची खेळी केली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सनी विजय नोंदवत सलग तिसरा विजय नोंदवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT