Glenn Maxwell Leg Fracture :  sakal
क्रीडा

Glenn Maxwell : वाढदिवस साजरा करताना मॅक्सवेलसोबत मोठी दुर्घटना; हाता-पायाला जबर मार, नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का, मॅक्सवेलचा मोडला पाय

सकाळ ऑनलाईन टीम

Glenn Maxwell Leg Fracture : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. मॅक्सवेलचा पाय तुटल्याने अष्टपैलू खेळाडू या संपूर्ण उन्हाळी हंगामात ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळू शकणार नाही. ग्लेन मॅक्सवेलच्या पाय फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर आता तो जवळपास 3-4 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. मॅक्सवेल हा टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. मॅक्सवेलने टी-20 विश्वचषकाच्या चार सामन्यात 39.33 च्या सरासरीने एकूण 118 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 161.64 होता. 

नेमकं काय घडलं -

वास्तविक, मॅक्सवेल मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. तिथे त्याच्यासोबत हा अपघात झाला. मित्राच्या घरामागे अंगणात धावत येत होता. यादरम्यान त्यांचा पाय घसरला. फ्रॅक्चरमुळे त्याचा पाय पूर्णपणे स्थिर झाला होता. या घटनेनंतर मॅक्सवेल बराच काळ क्रिकेटपासून दूर राहणार हे मात्र नक्की आहे. पुढील आठवड्यापासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत मॅक्सवेलचा समावेश करण्यात आला होता पण आता तो या मालिकेतून बाहेर पडला आहे.

मॅक्सवेलचा बाहेर पडणे ऑस्ट्रेलियासाठी मोठे नुकसान असणार आहे. तो एक उत्कृष्ट फलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. मॅक्सवेल त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे लांब षटकार मारण्याची क्षमता आहे. मॅक्सवेल क्षणार्धात सामन्याचा मार्ग बदलू शकतो. विशेष म्हणजे तो ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : ठाण्यात अपघाताचा थरार, कार डिव्हायडरला धडकली

Billionaires: वय फक्त 22! सूर्या मिधाने मोडला मार्क झुकरबर्गचा 18 वर्षांचा विक्रम; ठरला जगातील सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश

SCROLL FOR NEXT