Suryakumar Yadav Glenn Maxwell Big Bash League
Suryakumar Yadav Glenn Maxwell Big Bash League esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव बिग बॅश लीग खेळणार; काय म्हणतोय ग्लेन मॅक्सवेल?

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav : भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये 6 सामन्यात 189.68 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा करत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थान पटकावले होते. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेत क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावले. त्याने स्पर्धेतील दोन सामन्यात 124 धावा ठोकल्या यात 111 धावांच्या शतकी खेळीचा देखील समावेश होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने सूर्यकुमार यादवच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे.

ग्लेन मॅक्सवेल 'द ग्रेड क्रिकेटर्स' या कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, 'मला सामना (भारत आणि न्यूझीलंड) कधी सुरू झाला हे कळाले नाही. मात्र नंतर मी स्कोरकार्ड पाहिले आणि मी त्याचा फोटो फिंचीला (अॅरोन फिंच) पाठवला. मी म्हणाला, इथं काय चालू आहे? तो एका वेगळ्याच स्तरावरील फलंदाजी करतोय. इतर सर्वांच्या धावा बघ आणि या माणसाच्या धावा बघ 50 चेंडूत 111 धावा.'

मॅक्सवेल पुढे म्हणाला की, 'मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या डावाचा पूर्ण रिप्ले पाहिला. आम्हाला सर्वांना शरम वाटावी इतका तो इतरांपेक्षा इतका चांगला आहे. त्याला अशा प्रकारे बॅटिंग करताना पाहणे खूप जड गेले. त्याच्या जवळपासही कोणी नाही.'

दरम्यान, गंमतीने मॅक्सवेलला सूर्यकुमार यादव बिग बॅश लीगमध्ये खेळू शकतो का असे विचारले असता मॅक्सवेल म्हणाला की, 'आपल्याकडे इतका पैसा नाही. त्यामुळे ही शक्यता नाही. आपल्याला सर्व खेळाडूंना बाहेर काढावे लागेल आपल्याला ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील प्रत्येक करारबद्ध खेळाडूला काढून टाकावे लागले.' सूर्यकुमार यादवचा जवला आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT