Global Warming Protest During French Open Semi Final  esakal
क्रीडा

फेंच ओपनमध्ये व्यत्यय; आपल्याकडे फक्त 1028 दिवस उरलेत...

अनिरुद्ध संकपाळ

पॅरिस : फ्रेंच ऑपन टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या दोन सेमी फायनल (French Open Semi Final) पार पडल्या. पहिल्या सेमी फायनलमध्ये अलेक्झांडर झ्वेरेवच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे सामना सोडावा लागला आणि राफेल नदालने (Rafael Nadal) 14 व्यांदा फ्रेंच ओपनची फायनल गाठली. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये नॉर्वेच्या कॅस्पर रूडने मारिन सिलिचचा पराभव करत पहिल्यांदाच फ्रेंच ओपनची फायनल गाठली. मात्र या सामन्यादरम्यान एक नाट्य घडले. सामना सुरू असतानाच एक महिला कोर्टवर जबरदस्तीने घुसली. त्यामुळे सामना काही काळासाठी थांबवण्यात आला.

सामन्याचा तिसरा सेट सुरू होता. रूड 4-1 ने आघाडीवर होता. तेवढ्यात अचानक एक महिला कोर्टवर जबरदस्ती घुसली. त्यामुळे सामना थांबवावा लागला. कोर्टवर पोहचलेली महिला नेटजवळ जाऊन बसली. तिने गळ्यात बांधलेली चेन नेटला बांधून स्वतःला अकडवले. दरम्यान, लोकांचे लक्ष महिलेचे शर्टकडे गेले. या शर्टवर तिने आपल्या जवळ फक्त 1028 दिवस उरलेत असा संदेश लिहिला होता. ती ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) संदर्भात आंदोलन करत होती असा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रदर्शन करणाऱ्या महिलेचे नाव अलिजी असं सांगितलं जात आहे. ही 22 वर्षाची महिला पर्यावरण प्रेमी असल्याचे मानले जात आहे. यासंबंधी अजून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता एका फ्रेंच वेबसाईटचा शोध लागला. त्यात जगभरातील नेते आपल्याला अशा एका भविष्याकडे घेऊन चालले आहेत ज्यात फ्रेंच ओपन आयोजित करणे शक्य होणार नाही. असा मजकूर लिहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT