Gold medalist Vinesh Phogat left her Arjuna and Khel Ratna Awards on the pavement of Kartavya Path in New Delhi 
क्रीडा

Vinesh Phogat: विनेश फोगाटने परत केला अर्जुन आणि खेलरत्न; कर्तव्य पथावर ठेवले पुरस्कार

आशियाई खेळ आणि कॉमनवेल्थ खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या विनेश फोगाटने शनिवारी तिचे अर्जुन आणि खेल रत्न पुरस्कार कर्तव्य पथच्या मैदानावर ठेवलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आशियाई खेळ आणि कॉमनवेल्थ खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या विनेश फोगाटने शनिवारी तिचे अर्जुन आणि खेल रत्न पुरस्कार कर्तव्य पथावर ठेवले. (Gold medalist Vinesh Phogat left her Arjuna and Khel Ratna Awards on the pavement of Kartavya Path in New Delhi )

शनिवारी कुस्तीगीर विनेश फोगाटने अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार परत केला. ती पंतप्रधानांना भेटून पुरस्कार परत करणार होती. पण, पोलिसांनी फोगाटला पंतप्रधान कार्यालयापर्यंत जाऊ दिलं नाही. त्यामुळे ती कर्तव्य पथावर पुरस्कार ठेवून परत गेली. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने यासंदर्भात एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विनेश फोगाट पुरस्कार घेऊन चालत आहे. पुनियाने व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, असा दिवस कोणत्याही खेळाडूच्या जीवनामध्ये येऊ नये. आज देशातील कुस्तीगीर महिला सगळ्यात वाईट कालखंडातून जात आहेत.

पंतप्रधान मोदी यांना लिहिलं होतं पत्र

आशियाई खेळात सुवर्ण पदकाची कमाई केलीली कुस्तीपटू विनेश फोगाटने मंगळवारी आपण खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याचं जाहीर केलं होतं. तिने पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. कुस्तीगीर न्याय मिळण्यासाठी संघर्ष करत असताना पुरस्कार जवळ ठेवणे योग्य ठरणार नाही. आपले जीवन सरकारच्या जाहीरातीप्रमाणे नाही जे महिला सशक्तीकरणच्या गोष्टी करत असतं, असं ती मत्रात म्हणाली होती.

महिला कुस्तीगिरांनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. कुस्ती महासंघात ब्रिजभूषण सिंग यांच्या गटाचा विजय झाल्याने कुस्तीगीर साक्षी मलिक हिने खेळातून संज्ञास घेण्याची घोषणा केली होती. तसेच कुस्तीगीर बजरंग पुनिया याने आपला पुरस्कार परत केला होता. त्यानंतर सरकारने नव्या कुस्ती महासंघाची कार्यकारिणी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होईपर्यंत कुस्तीगिरांनी आक्रमक राहण्याचा पवित्रा घेतला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT