Hardik Pandya
Hardik Pandya Sakal
क्रीडा

कॅप्टन हार्दिक पांड्या म्हणतो, सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेसाठी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ सज्ज झालाय. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं दुखापतीसंदर्भात भाष्य केले. सध्याच्या घडीला मी नियंत्रणात असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करत आहे, असेही तो म्हणाला.

28 वर्षीय हार्दिक पांड्या 2019 पासून पाठिच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका विरुद्धच्या मालिकेला तो मुकला. त्यानंतर बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्ट पास करुन तो आता आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झालाय.

आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवरुन हार्दिक पांडयांचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. यात तो म्हणतोय की, ‘‘काही दिवसांपासून मी कुटुंबियासमवेत वेळ घालवत होतो. या काळात फिटनेसवरही भर देत होतो. चांगली तयारी करण्यासाठी माझ्याकडे खूप वेळही होता. सध्याच्या घडीला सकारात्मक विचाराने पुढे जात आहे. ज्या गोष्टी नियंत्रणात आहेत त्यावरच फोकस करतोय. गुजरातकडून चांगली कामगिरी केली तर भविष्यातील गोष्टी सहज आणि सुलभ होतील, असे म्हणत त्याने भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी आयपीएल हा मार्ग असेल, असेच संकेत दिले आहेत.

आयपीएलसाठी उत्सुक असण्यामागचे खास कारणही त्याने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. त्यामुळे कधी एकदा मैदानात उतरेन, अशी अवस्था झाली आहे, असेही तो म्हणाला. कठोर मेहनतीमुळे तुम्हाला यश मिळतेच असे नाही. पण तुम्ही ही प्रक्रिया योग्यरित्या केली तर याचा फायदा तुम्हाला होतोच, ही गोष्ट कळली आहे, असेही त्याने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT