Harbhajan Singh Journalist Twitter exchange over BCCI official Interfering in Selectors Meetings esakal
क्रीडा

हरभजन-पत्रकाराचा टिवटिवाट; BCCI अधिकाऱ्याची निवडसमितीत लुडबूड?

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि एका क्रीडा पत्रकारामध्ये (Journalist) बीसीसीआय अधिकारी (BCCI official) निवडसमितीच्या (Selection Committee) कामामध्ये लुडबूड करत असल्यावून ट्विटरवर शाब्दिक देवाण घेवाण झाली. एका क्रीडा पत्रकाराने ट्विटवर एक बीसीसीआय अधिकारी निवडसमितीच्या कामामध्ये लुडबूड करत असल्याचे ट्विट केले होते. त्याला हरभजन सिंगने प्रतिक्रिया दिली. (Harbhajan Singh Journalist Twitter exchange over BCCI official Interfering in Selectors Meetings)

त्या पत्रकाराने 'बऱ्याच काळापासून एक बीसीसीआय अधिकारी निवडसमितीच्या बैठकांना हजेरी लावत आहे. त्याला माहिती आहे की आपण यापासून दूर राहिले पाहिजे. कर्णधार (Captain), प्रशिक्षक (Coach) असहाय्य झालेत. ते काही करू शतक नाहीत. त्या अधिकाऱ्याचे तेथे काही काम नाही. मला आशा आहे की अशा घटना पुन्हा होणार नाहीत.'

त्यावर हरभजन सिंगने हे तुम्हाला कसं माहिती? आणि तो कोण अधिकारी आहे? असा प्रश्न त्या पत्रकाराला विचारला. त्यावर त्या पत्रकाराने 'चांगला प्रश्न आहे. तो तू विराट (Virat Kohli), रवी शास्त्री (Ravi Shastri), बीसीसीआय आणि निवडसमितीला विचारायला पाहिजेस. मला खात्री आहे की या पैकी काही लोकांना तुला त्यांचे मत सांगण्यात काहीच अडचण येणार नाही. ज्यावेळी ते तुला सांगतील त्यावेळी तू आम्हालाही सांग. असे प्रश्न सातत्याने विचारले गेले तर भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर जाईल. तू विराट आणि रवी शास्त्री यांच्यापासून सुरूवात करू शकतोस.' असे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT