Harbhajan Singh esakal
क्रीडा

Harbhajan Singh : हरभजन सिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

हरभजन सिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आयपीएलमध्ये दिसणरा वगेळ्या भुमिकेत?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा अव्वल फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) गेल्या अनेक वर्षापासून भारतीय संघाकडून खेळलेला नाही. तो अनेक वर्षापासून भारतीय संघाकडून खेळला नसल्याने तो चाहत्यांच्या विस्मृतीत गेला आहे. मात्र आता हरभजन सिंग (Harbhajan Singh) हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तो आपल्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या हरभजन हा आयपीएलमध्येच (IPL) संघात किंवा संघाच्या बेंचवर दिसतो. मात्र आता तो आयपीएलमध्येही वेगळ्या भुमिकेत दिसण्याची शक्यता आहे. (Harbhajan Singh may annouce his retirement)

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हरभजन सिंग हा आयपीएलमधील एका बड्या फ्रेंचायजीसोबत सपोर्ट स्टाफ म्हणून जोडला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये (IPL) हरभजन अनेक फ्रेंचायजीकडून खेळला आहे. गेल्या आयपीएल हंगामात हरभाजन कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळला होता. मात्र त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. पीटीआयनुसार हरभजन सिंग (Harbhajan Singh) हा पुढच्या आठवड्यात आपल्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

आयपीएलमधील एका सूत्राने पीटीआयला नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की त्यांची फ्रेंचायजी हरभजन सिंगला सहयोगी सल्लागार म्हणून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी आयपीएल लिलावात(IPL Auction) हरभजन या संघाकडून सहभागही नोंदवू शकतो. हरभजन सिंग हा युवा खेळाडूंना मदत करण्यासाठी इच्छुक आहे.

विशेष म्हणजे गेल्या हंगामात हरभजनने केकेआरचा (KKR) फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला मार्गदर्शन करण्यासाठी बराच वेळ दिला होता. सूत्र म्हणाले की, 'हरभजन हंगाम संपल्यानंतरच आपल्या निवृत्तीची घोषणा करणार होता. तो सध्या एका फ्रेंचायजीबरोबर चर्चा करत आहे. मात्र तो ज्यावेळी या फ्रेंचायजीबरोबर डील पक्की होईल त्यावेळीच यावर बोलणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT