Harbhajan Singh 
क्रीडा

Harbhajan Singh : भज्जीचा पंजाब क्रिकेट असोसिएशनवर मोठा आरोप; BCCI च्या विरोधात...

भज्जीच्या या आरोपांनंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये उडाली खळबळ

Kiran Mahanavar

Harbhajan Singh : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सल्लागार हरभजन सिंगने राज्यातील क्रिकेट संघटनेच्या अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भज्जीने पीसीए सदस्य आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या जिल्हा युनिट्सना पाठवलेल्या पत्रात कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव घेतलेले नाही. परंतु अनेक अधिकार्‍यांवर बेकायदेशीर कामात गुंतल्याचा आरोप केला आहे. भज्जीच्या या आरोपांनंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये खळबळ उडाली आहे.

हरभजनने या उपक्रमांबाबत राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवले आहे. राज्यभेचे खासदार हरभजनने आपल्या पत्रात लिहिले आहे की, या प्रकरणाचा मुख्य मुद्दा असा आहे की, पीसीए 150 सदस्यांना मतदानाचा हक्क देऊन आपल्या बाजूने झुकवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे बीसीसीआयच्या घटनेच्या पीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आणि नैतिक नियमांच्या विरुद्ध आहे.

हरभजनने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, मला 10-15 दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याबद्दल तक्रारी येत आहेत. माझी मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, परंतु अनेक निर्णयांशी संबंधित आहेत. योजना पुन्हा पुन्हा अंधारात ठेवल्या जात आहेत. आज मला सांगण्यात आले की त्यांनी 60-70 लोकांच्या सभासदत्वासाठी पैसे घेतले आहेत. ही प्रक्रिया त्वरित थांबवण्याची गरज आहे. सदस्यांना वैयक्तिकरित्या पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना कळवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा दर किती?

Viral Video : आरती सुरु असतानाच पुजाऱ्याला हृदयविकाराच्या झटका, जागेवरच मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : जयंत पाटील वर्षावर गेले, म्हणजे राजकारणात ट्विस्ट आहे; राष्ट्रवादीच्या नेत्याचं विधान

IND vs ENG 1st ODI: अक्षर पटेलची ऐतिहासिक कामगिरी! सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, युवराज सिंगसह सहा जणांशी बरोबरी

Sangli Crocodile Attack : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! मगरीने आधी खांदा पकडला, मग मानेवर झडप; पाठीत दात घुसल्याने गंभीर जखमी, 60 वर्षीय नागरिकाची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT