Harbhajan Singh Statement About If Yuvraj Singh Was Team India Captain
Harbhajan Singh Statement About If Yuvraj Singh Was Team India Captain esakal
क्रीडा

युवराज टीम इंडियाचा कर्णधार झाला असता तर.... काय म्हणतोय हरभजन?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : युवराज सिंग (Yuvraj Singh) हा भारतीय क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. त्याने 2007 च्या टी 20 आणि 2011 च्या वनडे वर्ल्डकप जिंकण्यात सिंहाचा वाटा उटलला होता. असे असले तरी युवराज सिंगला कधीही भारतीय संघाचे नेतृत्व (Team India Captain) करण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, त्याचा जुना संघ सहकारी हरभजन सिंगने (Harbhajan Singh) जर युवराज सिंग कर्णधार झाला असता तर तो कसा कर्णधार असता याचे वर्णन केले.

हरभजनला युवराज जर कर्णधार झाला असता तर काही खेळाडूंची कारकिर्द लांबली असती का असे विचारण्यात आले. त्यावेळी हरभजन सिंग म्हणाला, 'जर युवराज सिंगला कर्णधार केलं असतं तर आमच्या कुणाचीच कारकिर्द लांबली नसती. आम्ही जे काही क्रिकेट खेळलो आहे ते आमच्या क्षमतेच्या जोरावर. कोणत्याही कर्णधाराने आम्हाला वाचवले नव्हते. ज्यावेळी तुम्ही देशाचे नेतृत्व करत असता त्यावेळी तुम्हाला तुमची मैत्री बाजूला ठेवून प्रथम देशाचा विचार करावा लागतो.'

युवराज सिंग टीम इंडियाचा कर्णधार झाला असता तर काय झालं असतं असे विचाले असता हरभजन सिंग गंमतीने म्हणाला, 'जर युवराज सिंग भारताचा कर्णधार झाला असता तर आम्हाला लवकर झोपावे आणि लवकर उठावे लागले असते. आम्हाला खूप मेहनत करावी लागली असती.' हरभजन पुढे म्हणाला की, 'तो एक महान कर्णधार झाला असता. त्याची रेकॉर्डच सर्व काही सांगतात. ज्या 2011 च्या वर्ल्डकपमुळे आम्हाला आदर मिळतो त्या स्पर्धेत तो मालिकावीर होता.'

हरभजन आणि युवराज सिंगने आयपीएलमध्ये काही काळ नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. हरभजनने मुंबई इंडियन्सचे तर युवराज सिंगने पंजाब किंग्जचे काही सामन्यात नेतृत्व केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT