Harbhajan Singh Shane Warne esakal
क्रीडा

हरभजन सिंग शेन वॉर्नबाबतचा 'तो' किस्सा करणार आपल्या पुस्तकात सामील

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) महान लेग स्पिनर शेन वॉर्नबद्दलचा (Shane Warne) एक किस्सा ब्रेल लीच्या पॉडकास्टमध्ये सांगितला. हा किस्साआपल्या पुस्तकात देखील सामील करणार असल्याचे हरभजनने सांगितले. हा किस्सा ज्यावेळी नवखा हरभजन सिंग पहिल्यांदा शेन वॉर्न सोबत बोलला होता त्यावेळीचा आहे. ही घटना ऑस्ट्रेलिया संघ 2001 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता त्यावेळी चेन्नई टेस्टमध्ये घडली होती.

हरभजनने सांगितले की, मी चेन्नईतील कसोटी (Chennai Test) खेळत होतो त्यावेळी माझ्यासाठी हा फॅनबॉय (Fanboy) क्षण होता. मी माझा हिरो शेन वॉर्नकडे एकसारखे पाहत होतो. मात्र शेन वॉर्नला काहीतरी वेगळेच वाटले. हा एक मजेदार किस्सा आहे आणि मी माझ्या पुस्तकात नक्की याबाबत उल्लेख करणार आहे. हे पुस्तक पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे असेही हरभजन म्हणाला.

हरभजन सिंगने शेन वॉर्नबाबतचा किस्सा सांगितला. 'ती माझी आणि शेन वॉर्नची छोटी भेट होती. 2001 च्या मालिकेत मी 32 विकेट घेतल्या होत्या. चेन्नईतील तिसऱ्या कसोटीत वॉर्न स्टीव्ह वॉबरोबर फलंदाजी करत होता. शेन वॉर्न नॉन स्ट्राईकर एन्डवर होता. मी गोलंदाजीसाठी माझ्या रनअप वर उभा होतो मात्र मी शेन वॉर्नकडेच टक लावून बघत होते. त्यावेळी वॉर्नला काही वेगळे वाटले त्याने माला विचारले की भावा काय झालं आहे तू असा माझ्याकडे का बघत आहेस?'

शेन वॉर्नला मी काहीतरी त्याला बोलणार असल्याचे वाटले. त्यावेळी मी वॉर्नजवळ गेलो आणि त्याला माझ्या मनातील त्याच्याप्रती असलेल्या भावना बोलून दाखवल्या. मी माझ्या हिरोकडे बघत आहे. तुम्हाला लाईव्ह खेळताना बघणे हे माझे स्वप्न होते. मात्र आता मी तुमच्यासोबत खेळत आहे. हा माझ्यासाठी मोठा क्षण आहे. यावर वॉर्नने थाँक्स भावा अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर आमची बाँडिंग चांगले झाले. मी मालिकेत 32 विकेट घेतल्यानंतर वॉर्नने मला शुभेच्छा दिल्या. वॉर्न म्हणाला की शाबास तू खूप पुढे जाशील'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT