Hardik Pandya sakal
क्रीडा

Hardik Pandya : पाकिस्तानवरच्या विजयानंतर अफगाण चाहत्याने पांड्याचं घेतलं चुंबन - video

देशभरातून सोशल मीडियावर विजयाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ समोर येत आहेत. विजयाच्या सेलिब्रेशनचा असाच एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. हा व्हिडिओ भारतामधून नसून अफगाणिस्तानचा आहे.

Kiran Mahanavar

Hardik Pandya Asia Cup 2022 : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत रविवारी रात्री झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना नाचण्याची संधी मिळाली. देशभरातून सोशल मीडियावर विजयाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ समोर येत आहेत. विजयाच्या सेलिब्रेशनचा असाच एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. हा व्हिडिओ भारतामधून नसून अफगाणिस्तानचा आहे.

भारताच्या या विजयानंतर चाहत्यांनी रात्रभर जल्लोष केला. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये अफगाणिस्तानचे चाहते भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर एक अफगाण चाहता त्याच्या जागेवरून उठतो आणि टीव्ही स्क्रीनवर हार्दिक पांड्याला किस करून रूममधून बाहेर जातो. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.

आशिया कप 2022 टी-20 स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ देखील सहभागी होत आहे. मात्र, अफगाणिस्तानला श्रीलंका आणि बांगलादेशसह ब गटात ठेवण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला होता.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला 19.5 षटकात 147 धावांवर बाद केले आणि त्यानंतर 19.4 षटकात 5 विकेट्स घेत लक्ष्य गाठले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने चार, हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले, तर फलंदाजीत विराट कोहली (35), रवींद्र जडेजा (35) आणि हार्दिक पांड्या (33) यांनी शानदार खेळी केली. पंड्याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT