Hardik Pandya esakal
क्रीडा

Hardik Pandya : टीम इंडियात परतण्याचा मुहूर्त ठरला! हार्दिक पांड्याबाबत जय शहांनी दिली मोठी अपडेट

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघाबाहेर होता. आता हार्दिक पांड्याच्या टीममधील वापसीची तारीख ठरली आहे. याबाबतची माहिती खुद्द बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिली आहे.

हार्दिक पांड्या पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात अफगाणिस्तान विरूद्ध होणाऱ्या टी 20 मालिकेत भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी पीटीआयशी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे.

भारत अफगाणिस्तानविरूद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका भारतातच होणार आहे. अफगाणिस्ताविरूद्धची ही मालिका 11, 14 आणि 17 जानेवारीला खेळवली जाणार आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्याला वनडे वर्ल्डकपदरम्यान दुखापत झाली होती. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर तो संघाबाहेर गेला. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत देखील तो खेळला नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी देखील तो फिट नव्हता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

Shirur Crime : बेकायदेशीरपणे भिशी, दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे अमीष; वीस कोटींहून अधिक रकमेचा अपहार, तीन महिलांसह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल

PM Modi cabinet: मोदींनी सर्वांनाच मागे टाकलं! मंत्रिमंडळ बैठकीत तपासलं मंत्र्यांचं डिजिटल रिपोर्ट कार्ड; 'सोशल मीडिया'वर विशेष लक्ष

आता सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार! ‘या’ वेबसाईटवर करावा लागणार अर्ज; ५० हजारांपेक्षा कमी रकमेसाठी लागणार नाही ‘एफआयआर’, वाचा...

SCROLL FOR NEXT