dinesh karthik, krunal pandya, hardik pandya
dinesh karthik, krunal pandya, hardik pandya esakal
क्रीडा

पांड्याने भावाचा घेतला बदला; 3 वर्षापूर्वी डिके न काय केलं होत?

धनश्री ओतारी

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात (Ind vs Sa 1st T20) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याने दिनेश कार्तिकसोबत जे काही केलं ते पाहून तो ट्रोल होताना दिसत आहे. अशातच हार्दिकच्या कृत्याचे कारण समोर आलं आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात हार्दिक पांड्या पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये दिसला. त्याने 12 चेंडूवर 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. त्याचवेळी, भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात हार्दिकने दिनेश कार्तिकला फटकारले असल्याचे पाहायला मिळालं. पांड्याने कार्तिकला स्ट्राईक दिला नाही. पांड्याच्या या भूमिकेमुळे चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

३ वर्षापूर्वीचा घेतला बदला

क्रिकेट चाहत्यांनी साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात पांड्याने कार्तिकसोबत घेतलेल्या भूमिकेचा सबंध २०१९ मधील घटनेशी जोडला आहे.

२०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध दिनेश कार्तिक जेव्हा हार्दिकचा भाऊ म्हणजेच कृणाल पांड्यासोबत क्रिजवर उतरला होता तेव्हा कार्तिकडे कृणालला रन काढण्यापासून रोखले होते.

२०१९ मध्ये नेमकं काय घडलं होत?

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टिम साऊदीने अखेरीचा ओव्हर टाकली होती. अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने शॉट खेळला पण धाव काढण्यास नकार दिला. त्यावेळी दुसऱ्या स्ट्रईकवर कृणार पांड्या उभा होता. हा सामना दिल्ली येथे खेळवण्यात आला होता.

याच घटनेचा संबध नेटकरी थेट काल झालेल्या सामन्याशी जोडत आहेत.

साऊथ अफ्रिकेविरुद्ध सामन्यात नेमकं काय घडलं?

20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार ऋषभ पंत बाद झाल्यानंतर कार्तिक क्रिजवर आला. पुढील चेंडू नॉर्टजेने कार्तिकला टाकला, त्यानंतर डीके त्यावर धावा करू शकला नाही. तिसर्‍या चेंडूवर कार्तिकने हार्दिक पांड्याला एक धाव घेऊन स्ट्राइक दिली, पण यादरम्यान तो धावबाद होण्यापासून बचावला.

फिल्डींग थ्रो स्टंपला लागला असता तर डीके आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला असता. चौथ्या चेंडूवर पांड्याने षटकार मारला, पण पुढच्या चेंडूवर त्याने डीप मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळला, धाव घेण्याची संधी होती, पण पांड्याने धाव घेण्यास नकार दिला. पांड्याने डीकेला स्ट्राइक दिली नाही आणि स्वतः सामना संपवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेत त्याने संघाची धावसंख्या 211 धावांवर नेली.

या सामन्यात डीके केवळ २ चेंडूवर एक रन करु शकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT