HARDIK PANDYA esakal
क्रीडा

IPL 2022: हार्दिक पांड्याचा 'बॉम्ब एक्सपर्ट' अवतार

क्रीडा विश्वामध्ये आयपीएलची मोठी क्रेझ आहे. आता पुन्हा आयपीएलच्या नव्या सत्राला सुरुवात होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

IPL NEWS: क्रीडा विश्वामध्ये आयपीएलची मोठी क्रेझ आहे. (VIRAL NEWS) आता पुन्हा आयपीएलच्या नव्या सत्राला सुरुवात होणार आहे. 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) बाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी क्रेझ आहे. याचा अंतिम सामना 29 मेला खेळला जाणार आहे. या टूर्नामेंटमध्ये (IPL Tournament) अनेक प्रकारचे बदल पहायला मिळतील. जसे की, यंदाच्या आईपीएलमध्ये दोन नव्या टीम्स खेळताना दिसतील. गेल्या काही दिवसांपासून नव्या सीझनची चर्चा सुरु होती. यादरम्यान आयपीएल 2022 चा एक नवा प्रोमो व्हीडियो आता समोर (SOCIAL MEDIA NEWS) आला आहे. यात हार्दिक पांड्या (HARDIK PANDYA) एका नव्या अवतारात दिसतो आहे.

देशाचा पहिला बहुभाषिक माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू अॅपवर यह वीडियो काही वेळातच इतका व्हायरल झाला, की तो या सोशल मीडिया मंचावर ट्रेंड करू लागला. या व्हीडियोमध्ये हार्दिक पांड्याला एका 'बॉम्ब एक्सपर्ट'च्या रुपात दाखवले आहे. हार्दिक यात बॉम्ब डिफ्यूज टीमला एक गुरुमंत्र देताना दिसतात. “नए को कभी कम मत समझना। नया जब भी कटेगा, 100 टका फटेगा।” हा तो मंत्र. यानंतर इसके टीमचे सदस्य म्हणतात, 'सही बोला सर।' खरेतर, हा व्हीडियो आयपीएलच्या प्रोमोचा आहे, ज्यात दोन नव्या टीम्स सहभागी झाल्यानंतर आता 10 टीम्स झाल्या आहेत. या दोन नव्या टीम्स जोडल्या गेल्याने आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये काय धमाका होणार आहे.

भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू अॅपवर एक्सक्लूसिव रूपात समोर आलेल्या या व्हीडियोत मुख्य गोष्ट ही सांगितली गेली आहे, की या खेळात आता आठऐवजी 10 टीम्स असणार आहेत. आता हा खेळ अजूनच रोमांचक होणार असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT