T20 World Cup 2024 Team India sakal
क्रीडा

हार्दिक पांड्या T20 World Cup मध्ये खेळला तर रोहित शर्माची कॅप्टन्सी जाणार?

Hardik Pandya and Rohit Sharma News |

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Team India : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान त्याला दुखापत झाली होती. सध्या हार्दिक पांड्या संघात पुनरागमन करण्यासाठी खूप कसरत करत आहे. पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे हार्दिक पांड्याला अफगाणिस्तानसोबतच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही.

हार्दिकच्या अनुपस्थितीत टी-20 संघाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. आता हार्दिक पांड्या जून 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप खेळताना दिसेल अशी पूर्ण आशा आहे. ज्यानंतर मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, हार्दिक पांड्या टी-20 संघात परतल्यानंतर रोहित शर्माचे कर्णधारपद जाणार का?

हार्दिक पांड्या सध्या संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे. हार्दिकच्या वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने येत आहेत. मात्र हार्दिक संघात कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. ज्यानंतर बातम्या समोर आल्या की, रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्येही टीम इंडियाचा कर्णधार असेल.

आता दुसरीकडे, हार्दिक पांड्याही टी-20 वर्ल्ड कपसाठी स्वत:ला तंदुरुस्त करत आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या पुनरागमनानंतर टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार हे अजुन तरी ठरले नाही.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज मोहालीतील पीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही प्रदीर्घ कालावधीनंतर टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना! वडाचे झाड अंगावर कोसळून दोन महिला जखमी; प्रकार CCTV मध्ये कैद

Satara News: माण तालुक्यात धक्कादायक प्रकार; एफडीएच्या भीतीने दूध रस्त्यावर ओतल्याने भेसळीच्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Solapur: पत्नीच्या भांडणाला व तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने राहत्या घरी घेतला गळफास मोहोळ तालुक्यातील यावली येथील घटना

SCROLL FOR NEXT