Hardik Pandya Selfish  esakal
क्रीडा

Hardik Pandya Selfish : सेल्फिश हार्दिक! धोनीची स्टाईल मारण्याच्या मोहापायी 20 वर्षाच्या युवा तिलकचं केलं नुकसान

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Selfish : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात अखेर आपल्या लौकिसास साजेसा खेळ केला. विंडीजचे 160 धावांचे आव्हान 17.5 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत आपले मालिकेतील आव्हान कायम राखले. (Tilak Varma Half Century)

भारताकडून सूर्यकुमार यादवने 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर युवा तिलक वर्माने नाबाद 49 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्माला टी 20 कारकिर्दीतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र कर्णधार हार्दिक पांड्याने विजयासाठी 2 धावांची गरज असताना षटकार मारत त्याच्यावर पाणी फेरले.

तिलक वर्माने तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादव सोबत 87 धावांची दमदार भागीदारी रचली होती. तो सूर्यकुमार समोर असतानाही आक्रमक पद्धतीने खेळत होता. सूर्या 83 धावा करून बाद झाल्यानंतर तिलक वर्माने भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने हार्दिक सोबत चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी रचली.

दरम्यान, तिलक वर्मा भारताला विजयासाठी 3 धावांची गरज असताना वैयक्तिक 48 धावांवर खेळत होता. त्याने रोव्हमन पॉवलच्या चौथ्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक हार्दिकला दिले. संपूर्ण षटक एक एक धावा घेणारा हार्दिक तिलकचे अर्धशतक पूर्ण व्हावे यासाठी एक धाव करून तिलकला स्ट्राईक देईल असे वाटले होते.

मात्र हार्दिक पांड्याने पाचव्या चेंडूवर षटकार मारत धोनी स्टाईलने सामना संपवला. मात्र या स्टाईलबाजीमुळे तिलक वर्माला त्याचे दुसरे टी 20 अर्धशतक पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही. यानंतर सोशल मीडियावर सेल्फिश या नावाचा ट्रेंड सुरू झाला. नेटकरी हार्दिकला ट्रोल करू लागले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT