Hardik Pandya sakal
क्रीडा

Hardik Pandya : चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावर स्ट्रेचरवरून बाहेर गेला पांड्याने तेच मैदान गाजवले

ज्या मैदानावर धमाकेदार कामगिरी त्याच मैदानावर हार्दिकच्या कटू आठवणी; चार वर्षापूर्वी....

Kiran Mahanavar

Hardik Pandya IND vs PAK in Asia Cup : हार्दिक पांड्याने त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला आशिया कप 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 5 विकेटने विजय मिळवून दिला. या सामन्यात हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. हार्दिक पंड्याला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले.

सामना जिंकून पांड्या हिरो बनला आहे, पण चार वर्षांपूर्वी एक वेळ अशी आली होती, जेव्हा पांड्याला या मैदानावर स्ट्रेचरवर घेऊन जावे लागले होते. हा सामना 19 सप्टेंबर 2018 रोजी आशिया चषका अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध खेळला जात होता. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या अठराव्या षटकात पांड्या गंभीर जखमी झाला. पांड्या वेदनांनी रडत जमिनीवर पडला. त्याने हॅमस्ट्रिंगची तक्रार केली. त्याला इतका वेदना होत होता की त्याला उभेही राहता येत नव्हते. पांड्याला स्ट्रेचरवरून बाहेर काढावे लागले. त्यानंतर असं वाटत होतं की, पांड्याची कारकीर्द कदाचित संपुष्टात येईल. पण दुखापतीतून पुनरागमन करत आता त्याच मैदानावर पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून तो हिरो बनला.

आशिया चषक स्पर्धेत 2018 च्या खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 162 धावांवर गारद केले. यानंतर सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा भारताने 29 षटकांत 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पांड्याने 4.5 षटकात 24 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकांत 147 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 43 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने हा खडतर सामना 19.4 षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला. हार्दिकने षटकार मारून सामना संपवला.

भारताकडून विराट कोहलीने 35 धावा, रवींद्र जडेजाने 29 चेंडूत 35 धावा आणि हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 33 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने तीन आणि नसीम शाहने दोन गडी बाद केले. भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात 32 धावांची गरज होती आणि भारतीय फलंदाजांनी दोन चेंडू राखून लक्ष्य गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : ९ फूट लांबीच्या अजगराचे थरारक रेस्क्यू; धारावीतील नॅचरल पार्क परिसरात सर्पमित्र पोलिसाची धाडसी कामगिरी

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT