Hardik Pandya esakal
क्रीडा

Hardik Pandya : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेपाठोपाठ हार्दिक पांड्या दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्याला देखील मुकणार

हार्दिक पांड्या : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यावेळी दुखापत, अजूनही फिट झालेला नाही

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला बांगलादेशविरूद्धच्या सामन्यावेळी दुखापत झाली. त्यामुळे त्याला वर्ल्डकपचे अर्वरित सामन्याला मुकावे लागले. तो ऑस्ट्रेलियाविरूद्धची तीन टी 20 सामन्यांची मालिका देखील खेळणार नाहीये. मात्र आता तो दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्याला देखील मुकणार आहे. तो अजून दोन महिने तरी क्रिकेटच्या मैदानावर उतरू शकणार नाही.

हार्दिक पांड्या बांगलादेशविरूद्धच्या सामन्यावेळी आपल्याच गोलंदाजीवर मारलेल्या स्ट्रेट ड्राईव्ह पायने आडवण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. तो आपले षटक पूर्ण न करताच मैदानातून बाहेर गेला. त्यानंतर तो वर्ल्डकपच्या बाद फेरीत दुखापतीतून सावरेल अशी अशा व्यक्त केली जात होती. मात्र तो अजूनही फिट झालेला नाही.

हार्दिक पांड्याची दुखापत ही भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हार्दिक पांड्या संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची आक्रमक फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजी परिणामकारक आहे. त्याची उणीव नक्कीच भारतीय संघाला जाणवले.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या आगामी टी 20 मालिकेपाठोपाठ दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर देखील पांड्याची उणीव भारतीय संघाला जाणवणार आहे. मधल्या फळीतील एक फलंदाज कमी होणार आहे. तसचे गोलंदाजीचा एक पर्याय देखील कमी होणार आहे. यामुळे भारताचे 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपच्या तयारीचं प्लॅनिंग देखील कोलमडणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

SCROLL FOR NEXT