क्रीडा

Shreyas Iyer Broke Bat : हारिस रौफने श्रेयस अय्यरची बॅटच तोडली, रोहित - विराट बाद झाल्यावर काय झालं 8 व्या षटकात

अनिरुद्ध संकपाळ

Shreyas Iyer Broke Bat : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र शाहीन आफ्रिदीविरूद्ध भारताच्या टॉप ऑर्डर उडवली. त्यानंतर हारिस रौफने देखील भारताला तिसरा धक्का दिला.

दरम्यान, वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या एका वेगवान चेंडूमुळे श्रेयस अय्यरची बॅटच तुटली. चेंडूचा वेग आणि श्रेयसच्या फटक्यात इतकी अचूकता होती की बॅट तुटल्यानंतरही चेंडू सीमापार गेला. मात्र रौफने अखेर अय्यरच्या या दोन चौकारांचा बदला पुढच्या षटकात घेतलाच.

भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार असा अंदाज हवामान खात्यानं दर्शवला होताच. त्याप्रमाणे सामन्याची चार षटके झाल्यानंतर पावसाचे सुरूवात झाली. पावसामुळे खेळ थांबला. मात्र काही काळानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

सामना पुन्हा सुरू झाला त्यावेळी भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सेट होण्याचा प्रयत्न करत होते. मात्र शाहीनने रोहित शर्माच्या बॅट पॅड गॅपमधून त्याची दांडी गुल करत भारताला पहिला धक्का दिला.

यानंतर आलेल्या विराट कोहलीकडून मेलबर्नमधील खेळीची अपेक्षा होती. माक्ष ढगाळ वातावरणात चेंडू हातभर स्विंग करणाऱ्या शाहीनने विराटचीही शिकार केली. त्याने विराटचा देखील त्रिफळा उडवला.

भारताची अवस्था 2 बाद 27 धावा अशी झाल्यानंतर पाकिस्तानविरूद्ध पहिल्यांदाच खेळणारा श्रेयस अय्यर क्रिजवर आला. तो आला त्यावेळी त्याने आश्वासक सुरूवात केली. त्याने हारिस रौफला दोन चौकार लगावत आपण चांगल्या टचमध्ये असल्याचे दाखवून दिले.

हारिस रौफ सामन्याचे आठवे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकात तो 147 ते 148 किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करत होता. याच षटकातील चौथा चेंडू हारिसने 147 किमी प्रती तास वेगाने टाकला. अय्यरनेही हा चेंडू चांगल्या प्रकारे कव्हर ड्राईव्ह मारला. मात्र या दरम्यान त्याची बॅट तुटली. मात्र चेंडूचा वेग आणि अय्यरचा चांगला फटका यामुळे चेंडू सीमापार गेला.

मात्र अय्यरला आपली बॅट बदलावी लागली. या बदलेल्या बॅटने शेवटच्या चेंडूवरही अय्यरने रौफला चौकार लगावला. यानंतर रौफने आपल्या पुढच्या 10 व्या षटकात मात्र अय्यरचा बदला घेतला. त्याने 9 चेंडूत 14 धावा करणाऱ्या अय्यरला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT