Pro Kabaddi sakal
क्रीडा

Pro Kabaddi : पहिल्या जेतेपदाची आस ; पुण्यासमोर आज हरियाणाचे आव्हान

साखळी स्पर्धेत सर्वाधिक विजय, उपांत्य सामन्यातही शानदार कामगिरी अशी झेप घेणारा पुणेरी पलटणचा संघ प्रो कबड्डीच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी सज्ज झालाय. अजूनपर्यंत सर्व काही व्यवस्थित घडले, आता अवघी ४० मिनिटे आम्हाला झोकून देऊन खेळायचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : साखळी स्पर्धेत सर्वाधिक विजय, उपांत्य सामन्यातही शानदार कामगिरी अशी झेप घेणारा पुणेरी पलटणचा संघ प्रो कबड्डीच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी सज्ज झालाय. अजूनपर्यंत सर्व काही व्यवस्थित घडले, आता अवघी ४० मिनिटे आम्हाला झोकून देऊन खेळायचे आहे. विजेतेपद फार दूर नाही, असा विश्वास पुण्याचा कर्णधार अस्लम इनामदारने व्यक्त केला.

गत स्पर्धेतही पुण्याने अंतिम फेरी गाठली होती; परंतु जखमी झाल्यामुळे अस्लम अंतिम सामना खेळू शकला नव्हता आणि पुण्याचे स्वप्न जयपूरविरुद्ध निसटत्या पराभवामुळे पूर्ण झाले नव्हते. यंदा अस्लम आणि त्याची पुणेरी सेना पूर्ण जोशात आहे आणि फॉर्मातही आहे, त्यामुळे विजेतेपदासाठी ते प्रबळ दावेदार समजले जात आहेत.

चढाया आणि पकडींच्या खेळात पुण्याचा संघ समतोल आहे. स्वतः अस्लम, पंकज मोहिते आणि मोहित गोयत चढायांची बाजू सांभाळत आहेत तर पकडींमध्ये इराणचा मोहम्मद्रेझा, अभिनेष नटराजन बचावात अभेद्य कामगिरी करत आहेत. मी बाद झालो तरी जास्त वेळ कोर्ट बाहेर राहात नाही, कारण कोर्टवरील इतर सहकारी गुण मिळवून मला जीवदान देतात, असे अस्लमने सांगितले. उद्याही अस्लम कोर्टवर जेवढा जास्त राहिले तेवढे पुण्याची विजेतेपदाची शक्यता अधिक वाढणार आहे.

पुणेकरांना आवाहन

प्रो कबड्डीत पुण्याचा संघ आता बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. त्याचे श्रेय खेळाडूंसह संघ व्यवस्थापनालाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला जसा पाठिंबा दिला, तसेच अंतिम सामन्यासाठीही आम्हाला शुभेच्छा द्या, असे पुणेकरांना अस्लमने अंतिम सामन्याची तयारी करताना सांगितले. या मोसमात पुणे आणि हरियाना यांच्यात झालेल्या दोन साखळी सामन्यांत १-१ अशी बरोबरी राहिलेली आहे. जो सामना आम्ही त्यांच्याविरुद्ध गमावला होता, त्यातील चुका सुधारण्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि अर्थातच आत्मविश्वास प्रबळ असल्यामुळे आम्ही प्रत्येक संधीचा फायदा घेऊ, असे अस्लम म्हणाला.

जयदीप दहिया याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हरियानाचाही संघ तेवढाच आत्मविश्वास बाळगून आहे. उपांत्य सामन्यात आम्ही गतविजेत्या जयपूरला हरवले आहे त्यामुळे सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावलेले आहे, असे जयदीपने सांगितले. हरियाना संघात भारतीय कबड्डीतील कोणताही नावाजलेला चेहरा नाही; परंतु सर्व नवोदित खेळाडू कमाल कामगिरी करत आहे. अष्टपैलू खेळ ही आमची जमेची बाजू असल्याचे जयदीप म्हणतो. हरियाना संघाची मदार चढायांमध्ये शिवम पाठारे, विनय यांच्यावर असणार आहे तर बचावात जयदीप, मोहित नंदाल अस्लमच्या चढायांना कसे रोखतात, यावर सामन्याचा कल अवलंबून असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT