Hayden Walsh Twitter
क्रीडा

WI vs AUS: गेल नव्हे या कॅरेबियनच्या जाळ्यात फसले कांगारु

कॅरेबियन लेग स्पिनरने टी-20 सामन्यांच्या मालिकेत लक्षवेधी कामगिरी केलीये.

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलिया (Australia) संघ सध्याच्या घडीला वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. टी 20 मालिकेनं दोन्ही संघातील सामन्यांची सुरुवात झालीये. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाने तिसरा सामना गमावत 5 सामन्यांची मालिकाही गमावली. या सामन्यात फलंदाजीत गेलचा धमाका तर पाहायला मिळालाच याशिवाय घरच्या मैदानावरील मालिका विजयात 29 वर्षीय कॅरेबियन गोलंदाज हेडेन वॉल्श (Hayden Walsh) याने मोठी भूमिका बजावलीये.

कॅरेबियन लेग स्पिनरने टी-20 सामन्यांच्या मालिकेत लक्षवेधी कामगिरी केलीये. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलेच नाचवले. डावखुऱ्या गोलंदाजाने निर्माण केलेल्या दबावामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी इतर गोलंदाजांना विकेट फेकल्याचेही पाहायला मिळाले. पहिल्या तीन टी-20 सामन्यातील 12 षटकात 70 धावा खर्च करुन त्याने 8 विकेट घेतल्या आहेत.

पहिल्या टी-20 सामन्यात वॉल्शने आपल्या चार ओव्हर्सच्या कोट्यात 23 धावा खर्च करुन तिघांना माघारी धाडले. दुसऱ्या सामन्यातही त्याने 3 विकेट घेतल्या. दुसऱ्या सामन्यात 2 विकेटसह त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यासाठी त्याने केवळ 18 धावा खर्च केल्या. कांगारुंसाठी तो खूपच धोकादायक ठरला आहे.

उर्वरित दोन सामन्यात आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखून त्याला मॅन ऑफ द सीरिज मिळवण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यात त्याने 6.25 च्या सरासरीने 8 विकेट घेत टॉप विकेट टेकर बनलाय. त्याच्यापाठोपाठ मकाए दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 5 विकेट घेतल्या आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. मिचेल मार्शलनं पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही. परिणामी कांगारुंवर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. उर्वरित दोन सामन्यात ते कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. या मालिकेपूर्वी कांगारूंचा संघ उर्वरित दोन सामन्यातील विजयाने आत्मविश्वास प्राप्त करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price : डोनाल्ड ट्रम्पना मध्यावधी निवडणुकांत झटका बसताच कच्च्या तेलांचे दर कोसळले; आज भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग?

ChatGPT मध्ये आता तयार करता येणार ॲनिमेटेड GIF; स्वतःच्या फोटोला द्या नवा लूक

Rahul Gandhi Tweet on Gokul : सतेज पाटील यांना राहुल गांधींची साथ, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवड राजकारणावर राहुल गांधीचे ट्वीट

Latest Marathi News Live Update : वाढीव वीजबिल अन् घरपट्टीचा झटका; अहेरीत राष्ट्रवादी (SP) चे 'झटका आंदोलन'!

Gold Rate Today: ट्रम्पला धक्का अन् सोनं-चांदीचे भाव गरम! खरेदीदारांची चिंता वाढली; 2 दिवसांत सोन्यात सर्वात मोठी वाढ; ताजा भाव किती?

SCROLL FOR NEXT