Ind vs Pak Football Match sakal
क्रीडा

Ind vs Pak Football Match : फुटबॉल सामन्यादरम्यान भारत-पाकच्या खेळांडूमध्ये धक्काबुक्की; अन्यायकारक निर्णय सहन न करण्याचा निर्धार

पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल्ला इक्बाल हा रेषेजवळून फुटबॉल थ्रो करीत होता.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : सॅफ करंडकातील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत पूर्वार्ध संपायला काही क्षण बाकी असताना भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी पाकिस्तानी खेळाडूंच्या हातातून स्वत: फुटबॉल खेचून घेतला. यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना भिडले. तणाव निर्माण झाला.

स्टिमॅक यांना लाल कार्ड दाखवण्यात आले. या प्रकरणावर स्टिमॅक यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हटले, की माझ्या कृतीबद्दल तुम्ही माझा तिरस्कार कराल किंवा माझ्यावर प्रेम कराल, परंतु मी एक योद्धा आहे आणि अन्यायकारक निर्णयांपासून मैदानावर आमच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी मी पुन्हा तशा हालचाली करू शकतो, असे विश्‍वासाने त्याने सांगितले.

पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल्ला इक्बाल हा रेषेजवळून फुटबॉल थ्रो करीत होता. याचप्रसंगी स्टिमॅक यांनी त्याच्याकडून तो फुटबॉल खेचून घेतला. यानंतर पाकिस्तानी खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांना राग आला. भारतीय खेळाडू व पाकिस्तानी खेळाडू यांच्यामध्ये शाब्दिक चकमक घडली.

या सामन्याचे रेफ्री प्रज्वल छेत्री व संबंधित अधिकारी यांनी स्टिमॅक यांना लाल कार्ड दाखवले. त्यानंतर स्टिमॅक यांना उर्वरित सामन्यात रेषेजवळ उभे राहायला देण्यात आले नाही. यामुळे भारतीय फुटबॉल संघाचे सहायक प्रशिक्षक महेश गवळी त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला मार्गदर्शन करीत होते.

आता लढत नेपाळशी

भारतीय संघाने सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा ४-० असा धुव्वा उडवला. यजमान भारतीय संघासमोर अ गटातील लढतीत आता नेपाळचे आव्हान असणार आहे. भारत-नेपाळ यांच्यामधील लढत येत्या रविवारी रंगणार आहे. भारताची साखळी फेरीतील अखेरची लढत २७ जून रोजी कुवेत संघाविरुद्ध होईल.

काही बाबींमध्ये सुधारणा आवश्‍यक ः सुनील छेत्री

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने गोलांची हॅट्‌ट्रिक साजरी केली. याबाबत तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये गोल करणे आव्हानात्मक असते. तुम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळत असाल, तरीही गोल करणे सोपे नसते. अर्थात यापुढचा मार्ग सोपा नसणार आहे. आम्हाला काही बाबींमध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत, असे सुनील छेत्रीने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTO Helpline : ट्रॅव्हल्सवाले अव्वाच्या सव्वा भाडं घेतायत? कुठं अन् कशी करायची तक्रार? वाचा

Satara Minor Girl Case: साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन निर्घृण खून; ग्रामस्थांचा संशयित आरोपीच्या घरावर हल्ला अन्...

Kas Pathar: कास पठारावर पिवळ्या ‘मिकी माऊस’ची चादर; फुलांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात; पर्यटकांचा ओघ वाढला..

Wagholi Narcotics Seizure: तरुणाकडून वाघोलीत २२ लाखांची अफू जप्त

Truck Accident: संग्रामपूर तालुक्यातील टुनकी सोनाळा मार्गावर केळीने भरलेला ट्रक पलटी; दोघांचा मृत्यू, पाच जखमी

SCROLL FOR NEXT