Himani Phadke Pruthviraj Dange Wins Malvan Swimming Competition  
क्रीडा

कोल्हापूरचा पृथ्वीराज डांगे, नागपुरची हिमानी फडके वेगवान जलतरणपटू 

सकाळ वृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच येथील समुद्रात आज आयोजित केलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या गटात कोल्हापूरच्या पृथ्वीराज डांगे तर महिलांच्या गटात नागपूरच्या हिमानी फडकेने वेगवान जलतरणपटूचा बहुमान पटकाविला. स्पर्धेत राज्यातील 30 जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. 

उद्‌घाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या हस्ते झाले. या वेळी उपाध्यक्ष बाबा परब, सचिव राजेंद्र पालकर यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, बबन शिंदे, मंदार केणी, यतीन खोत यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. पारितोषिक वितरणास माजी खासदार नीलेश राणे यांनी उपस्थिती दर्शविली. अशोक सावंत, पूजा सरकारे, पूजा करलकर, ममता वराडकर, दीपक पाटकर, परशुराज पाटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

स्पर्धेचा निकाल असा -

2 किलोमीटर दिव्यांग- सिद्धी भांडारकर (नाशिक), अंजना प्रधान (नाशिक) 3 किलोमीटर 13 ते 15 वर्षे वयोगट- संजना जोशी (नागपूर), सानिका कवडे (नागपूर), नाईशा व्होरा (मुंबई), 2 किलोमीटर 11 ते 12 वर्षे वयोगट- वैष्णवी अहेर (नाशिक), क्षितिजा किरगत (सोलापूर), श्रावणी गोडख (नाशिक), 3 किलोमीटर 25 ते 35 वर्षे वयोगट- सोनाली वेंगुर्लेकर (बेळगाव), अनिता म्हात्रे (रायगड), सोनाली पतमसे (नागपूर), 2 किलोमीटर दिव्यांग- आदेश रुकडीकर (कोल्हापूर), ताहीर मुलानी (कोल्हापूर), प्रणव लोहाळे (नागपूर), 3 किलोमीटर 46 ते 55 वर्षे वयोगट- सुखजीत कौर (मुंबई), गायत्री फडके (पुणे), प्रीती चव्हाण (मुंबई), पाचशे मीटर 6 ते 8 वर्षे वयोगट- वेदांत मिसळे (बेळगाव), अद्वैत दळवी (बेळगाव), मैत्रेय सावंत (मुंबई), 3 किलोमीटर 13 ते 15 वर्षे वयोगट- आदित्य हिप्परगी (सोलापूर), अश्‍विन जैस्वाल (मुंबई), प्रथम गडाख (नाशिक), 3 किलोमीटर 25 वर्षे ते 35 वर्षे वयोगट- सिद्धार्थ गर्ग (पुणे), क्षितिज बेलापूर (सातारा), जुनैद खान (नाशिक), 1 किलोमीटर 8 ते 10 वर्षे वयोगट- आदित्य गर्ग (ठाणे), अनिष चव्हाण (ठाणे), सुमेधा कुलकर्णी (नाशिक), 1 किलोमीटर गतीमंद- जिया रॉय (मुंबई), पूजा विरा (मुंबई), सानिका वैद्य (ठाणे), 5 किलोमीटर 20 ते 25 वर्षे वयोगट- मयांक चाफेकर (ठाणे), प्रज्ज्वल वाघ (कोल्हापूर), स्वप्नील गोडसे (सातारा), 5 किलोमीटर 20 ते 25 वर्षे वयोगट- सुबीया मुलानी (कोल्हापूर), निकिता प्रभू (कोल्हापूर), सृष्टी कोनसावलीकर (नांदेड), 3 किलोमीटर 46 ते 55 किलोमीटर- संजय जाधव (सांगली), श्रीमंत गायकवाड (सातारा), प्रकाश वराडकर (सिंधुदुर्ग), 3 किलोमीटर 36 ते 45 वर्षे वयोगट- संदीप भोईर (रायगड), किरण पावेकर (सातारा), सुरेश मिथाकोल (सोलापूर), 3 किलोमीटर 13 ते 19 किलोमीटर- पृथ्वीराज डांगे (कोल्हापूर), स्मित डोर्लेकर (नागपूर), वीरधवल पाटील (कोल्हापूर), 6 ते 8 वर्षे वयोगट- अहिका हलगेकर (बेळगाव), शिवानी कुर्धा (पुणे), आयाना पटेल (नाशिक), 2 किलोमीटर 56 वर्षे वयोगटावरील- कल्लाप्पा पाटील (बेळगाव), सुभाष बर्गे (पुणे), सतीश कदम (सातारा), 5 किलोमीटर 36 ते 45 वर्षे वयोगट- उत्तरा पेठणे (नाशिक), गौरी पांडे (नाशिक), 5 किलोमीटर 15 ते 19 वर्षे वयोगट- हिमानी फडके (नागपूर), योगेश्‍वरी कदम (सांगली), अस्मिता म्हाकवे (कोल्हापूर), 2 किलोमीटर 11 ते 12 वर्षे वयोगट- नील वैद्य (रायगड), वेदांत गडख (नाशिक), मयांक धामणे (नाशिक), 2 किलोमीटर 56 वर्षावरील- वर्षा कुलकर्णी (सांगली), नसीम भालदानी (मुंबई), सोनल पाटील (मुंबई), 8 ते 10 वर्षे वयोगट- नैशी रूहील (मुंबई), अनुषा दळवी (मुंबई), अनन्या बिरंजे (मुंबई), 1 किलोमीटर गतीमंद- दक्ष फडके (नागपूर), चिन्मय फाटक (पुणे), ओम जुवाली (बेळगाव) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT