Hockey India Asian Games 2023 esakal
क्रीडा

Hockey India : हॉकी इंडियासाठी एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक फार महत्वाचं; नाही तर गाठावं लागेल पाकिस्तान

अनिरुद्ध संकपाळ

Hockey India Asian Games 2023 : हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी सांगितले की जर भारतीय पुरूष हॉकी संघ 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या हांगझू येथील एशियन्स गेम्समधून पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी थेट पात्र होऊ शकतो. मात्र जर यात अपयश आलं तर भारतीय हॉकी संघाला पाकिस्तानचा दौरा करावा लागले. त्याशिवाय पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र होता येणार नाहीये.

नियमानुसार, 'एशियन गेम्स 2023 मध्ये जो संघ सुवर्ण पदक पटकावेल तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होईल. मात्र इतर देशांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. यावेळी या पात्रता फेरीचं आयोजन पाकिस्तान आणि स्पेनची निवड करण्यात आली आहे.

हांगझूमध्ये मोहीम फत्ते करण्याचा असेल प्रयत्न

दिलीप तिर्कीने बुधवारी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'आम्ही हांगझूमध्येच मोहीम फत्ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र काही कारणास्तव आम्ही पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होऊ शकलो नाही तर क्वालिफायर सामन्यासाठी आम्हाला पाकिस्तान किंवा स्पेन दोन्हीपैकी कुठेही जावे लागेल.'

पाकिस्तानला जाण्यासाठी भारत सरकारची परवानगी लागते. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय हॉकी संघाला पाकिस्तानला जावं लागेल. त्यावेळी केंद्र सरकार काय भुमिका घेते हे पहावे लागले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather : पुण्यात थंडीला सुरुवात; पाच दिवसांत पारा येणार आणखी खाली

Wardha Crime: प्रेमसंबंधास नकार, तरुणीचा आवळला गळा तरुणीचा अन्...

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Balasaheb Thorat: जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनेच: बाळासाहेब थोरात; शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार

Nagpur Crime: कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाचा खून; पारडीतील घटना, चाकूने वार करीत संपविले

SCROLL FOR NEXT