Pakistan vs Bangladesh sakal
क्रीडा

T20 WC : पाकचा बांगलादेशविरुद्ध सामना; लक्ष भारत-झिम्बाब्वे लढतीवर

झिम्बाब्वे भारताचा पराभव करेल अशी अपेक्षा पाकिस्तान करत असले तरी....

सकाळ ऑनलाईन टीम

Pakistan vs Bangladesh T20 World Cup : झिम्बाब्वे भारताचा पराभव करेल आणि आपल्याला द्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता येईल, अशी अपेक्षा पाकिस्तान करत असले, तरी त्यांना त्याअगोदर बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे.

पाकिस्तान-बांगालदेश हा सामना भारत- झिम्बाब्वे सामन्याअगोदर होणार आहे. वास्तविक हा सामना बांगलादेशनेही जिंकला, तर त्यांचेही सहा गुण होतील आणि तेही शर्यतीत येतील, परंतु सध्या त्यांची निव्वळ सरासरी ऊणे असल्याने त्यांना मोठा विजय मिळवावा लागणार आहे.

भारत आणि झिम्बाब्वे या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी; पाक आणि बांगलादेश कोणत्याही परिस्थितीत विजयासाठीच शर्थ करतील. भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकने दक्षिण आफ्रिकेला चीत करून आपली गाडी रुळावर आणली, तर बांगलादेशचा संघ भारताकडून झालेल्या पराभवानंतर सावरत असला तरी भारताला विजयासाठी अखेपर्यंत झुंजवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढळलेला नाही.

कर्णधार बाबर आझम अपयशी ठरत असला, तरी पाकिस्तानचे इतर फलंदाज फॉर्मात आहेत. महम्मद हॅरिस, इफ्तेकार अहमद आणि शादाब खान यांच्याकडून बांगलादेशच्या गोलंदाजांना सावध राहावे लागणार आहे; तर फॉर्मात आलेला शहीन शाह आफ्रिदी बांगलादेशी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकेल. दोन्ही संघांची तुलना करता पाकचे पारडे जड आहे. अॅडलेडच्या मैदानावर हा सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT