क्रीडा

WTC Final : रोहित स्विंगसमोर अडखळतो, स्कॉट स्टायरिसचा दावा

नामदेव कुंभार

WTC Final 2021, IND v NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान होणाऱ्या महाअंतिम फायनल सामन्याला मोजकेच दिवस उरले आहेत. क्रीडा विश्व या सामन्याकडे डोळे लावून बसले आहे. इंग्लंडमधील परिस्थितीचा न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना फायदा होईल, त्यांच्यासमोर फलंदाजी करणं भारतीय फलंदाजांसाठी अग्नीपरीक्षाच असेल. भारतीय संघाला विजयावर शिक्कामोर्तब करायचं असल्यास रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यासारख्या फलंदाजाची कामगीरी महत्वाची ठरते. मागील काही दिवसांतील भारतीय संघाची कामगीरी पाहता सलामी फलंदाज रोहित शर्मावर मोठी जबाबदारी असेल. न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्टॉक स्टायरिस यानं रोहित शर्माची कमकुवत बाजू सांगितली आहे. स्टॉक स्टायरिसनं असा दावा केलाय की, रोहित शर्मा स्विंग चेंडूसमोर अडखळतो.

इंग्लंडमधील साउथम्पटन मैदानावरील खेळपट्टीवर चेंडू अधिक स्विंग होतो. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा स्विंगसमोर खेळताना अडखळतो. न्यूझीलंडमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार वेगवान स्विंग गोलंदाज आहेत. त्यामुळे रोहित शर्मासमोर मोठं आव्हानं असेल, असं स्टायरिस म्हणाला.

खेळपट्टी स्विंगसाठी अनुकूल असल्यास रोहित शर्माला अडचणीचा सामना करावा लागेल. न्यूझीलंडचा वेगवान मारा प्रभावी आहे. टीम साउथी आणि ट्रेंट बोल्ट या जोडगोळीसोबत कायल जेमीसन आणि नील वॅगनरचं आव्हानं असणार आहे. या गोलंदाजाच्या वेगवान आणि स्विंग माऱ्यासमोर रोहित शर्माची खरी कसोटी असेल, असं स्टायरिस म्हणाला.

WTC साठी वेगवान खेळपट्टी

साऊदम्पटन येथे होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सामन्यात उसळत्या चेंडूंसाठी पोषक खेळपट्टी बनवण्यात येणार आहे, असे खेळपट्टी विशेषज्ञ सिमॉन ली यांनी सांगितलं आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच पोषक असतात. WTC च्या फायनल सामन्यासाठीही अशीच खेळपट्टी तयार करण्यात येणार आहे. पहिले दोन दिवस या खेळपट्टीवर प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहू शकेल, असं ली म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Strike : सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा बेमुदत संप तुर्तास स्थगित मात्र 11 नोव्हेंबरला करणार निदर्शने आंदोलन!

माधवी खंडाळकर कुणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत? राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांवर गंभीर आरोप

Crime: जावयानं माझ्या मुलीला मारलं, सासूची तक्रार... मात्र सत्य समोर आल्यानंतर तोंड लपवावं लागलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार गटाचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला

Pune Crime: आधी खून मग लोखंडी भट्टीमध्ये पत्नीचा मृतदेह जाळला; पुण्यातल्या वारजे भागात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT