ICC 2023 ODI World Cup 
क्रीडा

मिशन ODI World Cup 2023 सुरुवात! फायनलमध्ये एन्ट्री करण्यासाठी होणार टक्कर

वेस्ट इंडिजने दोनदा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे पण...

Kiran Mahanavar

ICC 2023 ODI World Cup : एकदिवसीय विश्वचषक 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 10 संघांना सहभागी व्हायचे आहे, ज्यासाठी आठ संघ आधीच पात्र झाले आहेत. त्याचबरोबर उर्वरित दोन संघ क्वालिफायर खेळून जागा निश्चित करतील. दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिज संघ पात्रता फेरीही खेळणार आहे.

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पात्रता फेरीत 10 संघ सहभागी होत आहेत. या संघांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, नेपाळ, नेदरलँड, स्कॉटलंड, यूएसए, ओमान आणि यूएई यांचा समावेश आहे. या संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यानंतर दोन्ही गटातील 3-3 संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरतील. जिथे अंतिम सामना खेळण्यासाठी 6 संघांमध्ये लढत होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचणारे दोन्ही संघ विश्वचषकाच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील.

पात्रता फेरीतील पहिला सामना वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्यात 18 जून रोजी सकाळी 12.30 वाजता सुरू होईल. त्याचबरोबर नेपाळ आणि झिम्बाब्वे यांच्यातही सामना होणार आहे. वेस्ट इंडिज संघाने क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक 1975 आणि 1979 मध्ये जिंकला आहे.

एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी पात्रता फेरी:

एकदिवसीय विश्वचषक 2023 चे यजमान असल्याने भारतीय संघ आधीच पात्र ठरला आहे. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे ही पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर भारत आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी दोनदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने प्रत्येकी एक एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT