Sourav Ganguly sakal
क्रीडा

Sourav Ganguly : आयसीसीसाठी गांगुलींची शिफारस ?

भारतीय क्रिकेट मंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

सकाळ ऑनलाईन टीम

Sourav Ganguly : आज होत असलेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी नवे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारतील, इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची औपचारिकताही पार पडेल, पण आयसीसीच्या कार्याध्यक्षपदाच्या निवडणुकीत बीसीसीआय आपला उमेदवार देणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.

ग्रेग बार्कले हे आयसीसीचे पुन्हा कार्याध्यक्ष होण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान मेलबर्न येथे आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची बैठक होत आहे आणि २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम तारीख आहे.

गांगुली यांना शक्य असूनही दुसरी टर्म बीसीसीआयमध्ये न दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे गांगुली यांना आयसीसीसाठी उमेदवारी देणार का, अशी चर्चा होत असताना या पदासाठी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याही नावाची चर्चा होत आहे. शेलार आज पदभार स्वीकारणार

मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार यांचा बीसीसीआय प्रशासनात प्रवेश होत असून खजिनदारपद त्यांना मिळाले आहे. शरद पवार, शशांक मनोहर यांच्यानंतर बीसीसीआयच्या महत्वाचा पदावर असणारे ते तिसरे मराठी व्यक्ती ठरतील.

कर सवलतीबाबत चर्चा अपेक्षित

भारतात पुढील वर्षी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा होत आहे आणि आयसीसीने कर सवलत मागितली आहे. केंद्र सरकारकडून कर सवलत मिळाली नाही तर बीसीसीआयला आपल्या खिशातून आयसीसीला रक्कम द्यावी लागेल आणि ती ९५५ कोटी इतपत असू शकेल. या मुद्यावर उद्या होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT