icc council member negative approach about pcb ramiz raja proposal  esakal
क्रीडा

आयसीसीने फिरवले पाकच्या मनसुब्यावर पाणी

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) वर्षाला चार देशांची एक स्पर्धा (4 Nation Tournament) भरवण्याचा प्लॅन तयार केला होता. याद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न गोळा करता येईल असा त्यांचा होरा होता. या प्रस्तावित चार देशांच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि भारत या देशांचा समावेश होता. मात्र आयसीसीने रमिझ राजांच्या (Ramiz Raja) या संकल्पनेवर पाणी फेरले आहे. आयसीसी क्रिकेट काऊन्सिलच्या (ICC Council Member) बहुतांश सदस्यांनी या संकल्पनेवर नकारात्मक सूर लावला.

पाकिस्तानचे चेअरमन रमिझ राजा यांनी रविवारी दुबईत झालेल्या आयसीसी बोर्ड मिटिंगमध्ये आपला ड्रीम प्रोजेक्ट चार देशांची क्रिकेट स्पर्धा ही संकल्पना मांडली. या प्लॅनमधील विस्तृत मुद्दे यावेळी त्यांनी मांडले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार काही बोर्ड सदस्यांनी या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला मात्र बहुतांश सदस्यांनी या संकल्पनेच्या विरोधात (Opposed) मते नोंदवली.

आयसीसी बैठकीत उपस्थित असलेल्या एका सदस्याने सांगितले की. 'रमिझ राजा यांनी आपल्या संकल्पनेबाबत विस्तृत माहिती दिली. मात्र जास्तीजास्त सदस्यांनी द्विपक्षीय मालिकांवरच भर दिला. आशिया क्रिकेट काऊन्सिल सदस्यांनी आशियामध्ये फक्त आशिया कप ही एक मोठी स्पर्धा अस्तित्वात आहे. त्यामुळे त्यांनी चार देशांच्या स्पर्धेला पाठिंबा दर्शवला नाही.' याचबरोबर ज्या क्रिकेट बोर्डांना या स्पर्धेत स्थान नाही त्यांनी देखील पीसीबीच्या या प्रस्तावाला विरोध केला. याचबरोबर आधीच व्यग्र असलेल्या क्रिकेट वेळा पत्रकात या स्पर्धेला स्थान देणेही कठिण जाणार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT