pune sakal
क्रीडा

ICC Cricket World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचे जोरदार स्वागत

यंदा भारतात क्रिकेट विश्वचषक होत आहे, त्यामुळे चाहत्यांचा उत्साह साहजिकच शिगेला पोचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पाकिस्तान संघाला चारीमुंड्या चीत करून रविवारी पुण्यात दाखल झालेल्या भारतीय क्रिकेट संघाचे पुणे विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी साडेचारच्या सुमारास भारतीय क्रिकेटपटूंचे आगमन होताच चाहत्यांनी ‘इंडिया’ ‘इंडिया’चा जयघोष केला. क्रिकेटपटूंनी चाहत्यांना हात दाखवत अभिवादन केले.

पुण्यात क्रिकेट विश्वचषकातील पाच सामने होणार आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर गुरुवारी (१९ ऑक्टोबर) होणार आहे. त्यासाठी शनिवारीच बांगलादेशचा संघ पुणे विमानतळावर दाखल झाला. तर रविवारी दुपारी भारतीय संघ दाखल झाला. भारतीय संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी दुपारी तीन वाजल्यापासून क्रिकेट चाहत्यांनी टर्मिनलच्या ‘निर्गमन’ द्वारजवळ गर्दी केली होती. खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी मोठ्या बसची व्यवस्था केली होती. सुरक्षेसाठी शहर पोलिस व ‘सीआयएसएफ’च्या जवानांचा तगडा बंदोबस्त होता.

यंदा भारतात क्रिकेट विश्वचषक होत आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह साहजिकच शिगेला पोचला आहे. त्यातच शनिवारी भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघावर दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. विराटला पाहण्याची संधी हुकली विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते ताटकळत थांबले होते.

एका पाठोपाठ एक खेळाडू टर्मिनलमधून बाहेर पडले आणि बसमध्ये जाऊन बसले. मात्र, विराट कोहली व रोहित शर्मा हे विमानतळाच्या बाहेर आलेच नाही. ते दोघेही पुणे विमानतळावरूनच मुंबईला जाणाऱ्या विमानात बसले. त्यामुळे चाहत्यांना विराट कोहली व रोहित शर्मा यांना पाहण्याची संधी हुकली. विमान आधी आले, त्यामुळे ‘गो अराऊंड अहमदाबाद-पुणे या विमानात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू होते.

हे विमान चार वाजून ३० मिनिटांनी पुणे विमानतळावर येणे अपेक्षित होते. मात्र, चार वाजून १५ मिनिटांनी म्हणजे नियोजित वेळेच्या सुमारे १५ मिनिटे आधीच हे विमान पुणे विमानतळावर उतरू पाहत होते. त्यावेळी अन्य विमाने उतरत होती. तसेच एरोब्रिजवर देखील प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे ‘एटीसी’नी संबंधित विमानास ‘गो अराऊंड (विमानतळाभोवती चक्कर) करण्यास सांगितले. चार वाजून २५ मिनिटांनी विमान पुण्याच्या धावपट्टीवर उतरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT