ICC Cricket World Cup sakal
क्रीडा

ICC Cricket World Cup : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेत आज लढाई; पुण्यात कोण होणार ‘सवाई’

न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या चार लढतींत विजय साकारत उपांत्य फेरीत पाऊल ठेवण्याच्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एकदिवसीय विश्‍वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत उद्या (ता. १) शानदार खेळ करीत असलेल्या दोन देशांमध्ये झुंज रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड हे दोन देश पुणे, गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून उभय देशांसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचमुळे दोन्ही देशांसाठी या लढतीतील विजय निर्णायक ठरील.

न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या चार लढतींत विजय साकारत उपांत्य फेरीत पाऊल ठेवण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले; पण धरमशाला येथील दोन लढतींमध्ये त्यांचा पराभव झाला. भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशांविरुद्ध त्यांना निराशेला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्यास त्यांचा पाय खोलात जाऊ शकतो. न्यूझीलंडच्या उर्वरित दोन लढती पाकिस्तान व श्रीलंका या दोन आशियाई देशांविरुद्ध असणार आहेत. त्यामुळे न्यूझीलंडसाठी पुढील तीन लढती ‘करो या मरो’ अशाच असतील.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सहा लढतींमधून पाच लढतींमध्ये विजय मिळवले आहेत. एका लढतीत त्यांचा पराभव झाला आहे.

भारतीय संघानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीसाठी दावेदार समजला जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतरही त्यांचे आव्हान संपुष्टात येणार नाही, पण दक्षिण आफ्रिकेचा संघ निष्काळजी खेळ करणार नाही.

धावांचा पाऊस अन्‌ धावांचा पाठलाग

दक्षिण आफ्रिकन संघाला अद्याप एकही विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. दबावाखाली गळपटणारा संघ अर्थातच चोकर्स म्हणून त्यांना संबोधले जाते. यंदा मात्र त्यांचा संघ जबरदस्त कामगिरी करीत आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात दोन बाबी प्रकर्षाने दिसून येत आहेत. सहापैकी चार लढतींमध्ये त्यांनी ३०० च्या वर धावा उभारल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी चार लढतींमध्ये विजय मिळवला. नेदरलँड्‌सविरुद्धच्या लढतीत त्यांना धावांचा पाठलाग करताना अपयश आले. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर टीका होऊ लागली; मात्र पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत त्यांना २७१ धावांचा यशस्वी पाठलाग करताना आपण यामध्येही कमकुवत नसल्याचे दाखवून दिले.

आफ्रिकेचे वर्चस्व

दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत ७१ एकदिवसीय लढती झालेल्या आहेत. त्यापैकी ४१ लढतींमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने २५ लढतींमध्ये बाजी मारली आहे. पाच लढतींचा निकाल लागलेला नाही; मात्र मागील पाच लढतींमध्ये न्यूझीलंडने तीन सामन्यांमध्ये विजय साकारला आहे. दक्षिण आफ्रिकेला दोनच लढतींमध्ये विजय मिळवता आला आहे.

क्लासेन विरुद्ध रवींद्र

दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील खेळाडू छान खेळ करीत आहेत. क्विंटॉन डी कॉक, रॅसी वॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर हे दक्षिण आफ्रिकन फलंदाज तुफान फलंदाजी करीत आहेत. न्यूझीलंड संघातही त्याच तोडीचे खेळाडू आहेत. डेव्होन कॉनवे, राचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, जिमी निशम, टॉम लॅथम, ग्लेन फिलीप्स यांच्यामध्ये धडाकेबाज कामगिरी करण्याची क्षमता आहे. क्लासेन-रवींद्र हे दोन फलंदाज उद्या कशी कामगिरी करताहेत यावर सर्वांचे लक्ष असणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT