ICC T20 Ranking Virat Kohli Suryakumar Yadav
ICC T20 Ranking Virat Kohli Suryakumar Yadav esakal
क्रीडा

ICC T20 Ranking : अखेर विराटची प्रतिक्षा संपली; सूर्यकुमारला मात्र बसला फटका

अनिरुद्ध संकपाळ

ICC T20 Ranking Virat Kohli Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात विराटने शेवटपर्यंत किल्ला लढवत विजय मिळवून दिला. या खेळीचा विराट कोहलीला नुकत्याच जाहीर झालेल्या टी 20 रँकिंगमध्ये देखील फायदा झाला. बऱ्याच महिन्यांनंतर विराट कोहली टी 20 बॅटिंग रँकिंगच्या टॉप 10 मध्ये दाखल झाला आहे. तर रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवला मात्र फटका बसला.

विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्ध नाबाद 82 धावांची खेळी केली. त्याचा त्याला फायदा झाला असून या खेळीनंतर विराट कोहलीने टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये पाच स्थानांची उसळी घेतली आहे. तो आता टॉप 10 मध्ये दाखल झाला असून सध्या 9 व्या स्थानावर विराजमान आहे. या यादीत पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान हा 849 रेटिंग पॉईंट घेऊन अव्वल स्थानावर कायम आहे.

न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवॉयने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 92 धावांची दमदार खेळी केल्याने तो 831 रेटिंग पॉईंट घेऊन तीन स्थानांची सुधारणा करत दुसरे स्थान पटकावले. तर भारताचा सूर्यकुमार यादवची घसरण झाली असून 828 रेटिंग पॉईंट असलेला सूर्या तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याच्या खालोखाल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 799 रेटिंग पॉईंटसह चौथ्या स्थानावर आहे. 762 रेटिंग पॉईंटसह दक्षिण आफ्रिकेचा एडिन मारक्रम पाचव्या स्थाावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

LTTE Ban: राजीव गांधींची हत्या करणाऱ्या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली; मोदी सरकारचा निर्णय

The Great Indian Kapil Show: "मुलींसारखे कपडे घालून लोकांच्या मांडीवर बसणे, हे घृणास्पद!"; 'द कपिल शर्मा' शोवर भडकला कॉमेडियन

PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

Marathi News Live Update: नाशिकमध्ये बस-कारचा अपघात; कारमधील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT