ICC ODI Bowling Rankings Jasprit Bumrah Lost Top Spot  esakal
क्रीडा

ICC ODI Rankings : जसप्रीत बुमराहचा अव्वल क्रमांक कोणी हिसकावला?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : आयसीसीने आज वनडे रँकिंगची (ICC ODI Bowling Rankings) घोषणा केली. नुकत्याच जाहीर झालेल्या रँकिंगनुसार भारतीय संघातील स्टार वेगावान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) बुमराहचा टॉप स्पॉट हिसकावून घेतला आहे. बोल्टने 704 गुण मिळवले आहेत. तर बुमराहकडे 703 गुण होते.

आयसीसी वनडे गोलंदाज रँकिंगमध्ये पहिल्या स्थानाबरोबरच अजून दोन बदल झाले आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी एका पायरी वर चढला आहे. आता तो आठव्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडच्या ख्रिस वोक्सला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो आता नवव्या क्रमांकावर घसरला आहे. वोक्सला अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंमध्ये देखील नुकसान झाले आहे. वोक्स आता सहाव्या तर कॉलिन डी ग्रँडहोमीने पाचव्या स्थान पोहचला आहे.

दुसरीकडे गेल्या दोन ते तीन वर्षापासून धावांच्या दुष्काळातून जाणाऱ्या विराट कोहलीची वनडे रँकिंग पुन्हा घसरली आहे. त्याची रँकिंगमध्ये अजून एका स्थानची घसरण झाली आहे. तो आता चौथ्या क्रमांकावर आहे. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर फलंदाज क्विंटन डि कॉक देखील दोन स्थान घसरून 6 व्या स्थानावर आला आहे. तर इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रस्सी वॅन डुसेनने तीन स्थानांची उसळी घेत तिसऱ्या स्थान पटकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT