ODI Ranking Team India  esakal
क्रीडा

ODI Ranking Team India : भारतीय संघ वनडे रँकिंगमध्ये होऊ शकतो नंबर 1... रोहित सेनेला पेलावं लागणार शिवधनुष्य

अनिरुद्ध संकपाळ

ODI Ranking Team India : भारताने आशिया कप 2023 च्या सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका या दोघांना धोबीपछाड देत फायनल गाठली. आता त्यांचा सुपर 4 मधील शेवटचा सामना 15 सप्टेंबरला बांगलादेशविरूद्ध होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्धच्या विजयानंतर भारताला आयसीसी वनडे टीम रँकिंगमध्ये चांगला फायदा झाला आहे. आता टीम इंडिया रँकिंगमध्ये नंबर 1 देखील होऊ शकते.

नंबर 1 होण्यासाठी काय करावं लागेल?

भारताने आशिया कपमध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यानंतर रँकिंगमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या रँकिंग पाँईंट्समधील अंतर देखील कमी केलं. त्यामुळे भारताला वनडे टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे.

यासाठी आधी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ श्रीलंकेकडून पराभूत होणं गरजेचं आहे. त्यानंतर भारताला बांगलादेश विरूद्धचा सामना आणि आशिया कपची फायनल जिंकावी लागेल.

ऑस्ट्रेलियावरही बरंच काही अवलंबून

आशिया कपचे उर्वरित दोन्ही सामने जरी भारताने जिंकले तरी नंबर 1 होण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पराभवासाठी देखील देव पाण्यात ठेवावे लागतील. ऑस्ट्रेलियाला सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या शेवटच्या दोन सामन्यात पराभूत व्हावं लागले. तरच भारतीय संघ वर्ल्डकपपूर्वीच आयसीसी वनडे टीम रँकिंगमध्ये नंबर 1 होऊ शकतो.

जर हे सर्व दिव्य पार पडलं तरी भारताला आपले अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्धची तीन वनडे सामन्यांची मालिका 3 - 0 ने जिंकावी लागले.

पाकिस्तानचा संघ आशिया कपमधील श्रीलंकेविरूद्धचा आजचा सामना हरला तर त्यांना तीन रेटिंग पाँईंट्स गमवावे लागतील. यामुळे ते भारताच्या खाली तिसऱ्या स्थानावर घसरतील. जर त्यांनी लंकेला पराभूत केलं तर ते 119 रेटिंग पाँईंट्स घेत अव्वल स्थानावर पोहचतील.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींनी ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवून टाकला नवा बॉम्ब ! २२ वेळा मतदान, कोण आहे ती? सीमा, स्विटी, सरस्वती...;

Women's World Cup : कर्णधाराने ज्युनियर खेळाडूला कानाखाली खेचली... वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान महिला खेळाडूसोबत गैरवर्तवणुक, बोर्डाने दिली प्रतिक्रिया

Katraj Tunnel : कात्रज बोगद्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळला; प्रशासनाच्या निर्णयावर नागरिक संतप्त

Nashik News : नाशिक विकासकामांना 'ब्रेक'; पालकमंत्र्यांअभावी १० महिने थांबलेली कामे आता आचारसंहितेच्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

SCROLL FOR NEXT