ICC T20 WC 2022 India vs Pakistan Match 
क्रीडा

T20 WC 2022 वेळापत्रक जाहीर; भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी

सकाळ डिजिटल टीम

आयसीसीने यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुषांच्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

आयसीसीने (ICC) यंदा ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या पुरुषांच्या टी २० वर्ल्ड कप (T20 WC) स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये भारताचा (India) पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत (Pakistan) होणार आहे. टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना १६ ऑक्टोबरला होणार आहे. तर अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नवर होणार आहे. (ICC T20 WC 2022 India vs Pakistan Match)

वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण ४५ सामने होणार असून ७ वेगवेगळ्या शहरांमधील मैदानावर सामने रंगणार आहेत. १६ ऑक्टोबरला पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात होणार आहे.

टी २० वर्ल्ड कपमध्ये पहिली सेमिफायनल सीडनीत ९ नोव्हेंरला तर दुसरी सेमिफायनल १० नोव्हेंबरला अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. पहिल्यांदाच अॅडलेड ओव्हलवर वर्ल्डकपचा सामना रंगणार आहे. तर अंतिम सामना मेलबर्नवर १३ नोव्हेंबर रोजी होईल.(ICC T20 WC 2022 Timetable)

भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. भारताला सुपर १२ मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि दोन क्वालिफायरसह ग्रुप २ मध्ये ठेवण्यात आलं आहे. यामध्ये भारत पाच सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना २७ ऑक्टोबरला क्लालिफायरसोबत तर तिसरा ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. बांगलादेशविरुद्ध २ नोव्हेंबरला आणि ५ वा सामना ६ नोव्हेंबरला क्वालिफायर संघाविरुद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

SCROLL FOR NEXT