T20 World Cup 2024 esakal
क्रीडा

T20 World Cup 2024 : 'या' आयोजक देशाने घेतली माघार; वर्ल्डकपला अवघे काही महिने राहिले असताना ICC ला बसला धक्का

टी20 विश्व कप 2024: 'या' आयोजक देशाने माघार घेतली वर्ल्डकप, आयसीसीला धक्का

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 : आयसीसी टी 20 वर्ल्डकप 4 जून पासून वेस्ट इंडीज आणि युएसए येथे खेळवला जाणार आहे. 30 जूनपर्यंत खेळला जाणारा हा वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर आला असातानाच कॅरेबियन बेटातील एका देशाने आयोजनातून माघार घेतली आहे. त्यामुळे आयसीसीच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

डॉमिनिकाने आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2024 मधील आयोजनातून माघार घेतली आहे. डॉमिनिकाचे संस्कृती, युवा आणि क्रीडा विकास मंत्र्यांनी गुरूवारी याची घोषणा केली.

डॉमिनिकाच्या सरकराने आपण स्पर्धेसाठी लागणाऱ्या पायभूत सुविधा आणि मैदाने वेळेत पूर्ण करू शकणार नसल्याने टी 20 वर्ल्डकपच्या आयोजनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

डॉमिनिकामधील विंडसोर पार्क स्टेडियम हे टी 20 वर्ल्डकपचे सामने खेळवण्यासाठी निडवण्यात आलं होतं. येथे ग्रुप स्टेजमधील एक आणि सुपर 8 मधील दोन सामने आयोजित केले जाणार होते. एमओयू मधील बंधने पाळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे डॉमिनिकाने आयोजक देशांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

ठरल्या वेळेत स्टेडियमचे नुतनीकरण करणे शक्य नाही त्यामुळे स्टेडियम वेळेत पूर्ण तयार होणार नाही असं डॉमिनिकाच्या सरकारचं म्हणणं आहे. ते आपल्या वक्तव्यात म्हणतात, 'डॉमिनिका आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्याची आपली पत कायम ठेवली आहे. मात्र टी 20 वर्ल्डकप आयोजनातून माघार घेण्याचा निर्णय सर्वांसाठीच योग्य आहे.'

'डॉमिनिका सरकार अनेक वर्षांच्या क्रिकेट वेस्ट इंडीजच्या सहकाऱ्याबद्दल आभारी आहे. आम्ही भविष्यात देखील एकत्र काम करू. डॉमिनिका सरकार इतर आयोजकांना जूनमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन करावे यासाठी शुभेच्छा देते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: लासलगावमध्ये धान्य व टोमॅटो व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT