ICC T20I Rankings Suryakumar Yadav sakal
क्रीडा

ICC T20I Ranking : सूर्याची बादशाहत कायम! विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर

टी-20 फलंदाजी क्रमवारीत सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर

Kiran Mahanavar

ICC T20I Rankings Suryakumar Yadav : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात शानदार कामगिरी केल्यानंतर ICC T20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. सूर्यकुमार टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 टप्प्यात पाच डावांत तीन अर्धशतकांसह अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला होता.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

सूर्यकुमार यादव करिअरमधील सर्वोत्तम 869 रेटिंग गुण मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत 14 धावावर बाद झाल्याने त्याची दहा गुणाने घसरण झाली आहे, परंतु त्यांनी अव्वल स्थान कायम आहे. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक 296 धावा करणारा विराट कोहली पहिल्या 10 मधून बाहेर पडला असून तो 11व्या स्थानावर गेला आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावांची खेळी करत 22 स्थानांनी प्रगती करत 12 व्या स्थानावर पोहोचला आहे.

पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम पाचव्या स्थानावर राहिला तर डेव्हन कॉनवे चौथ्या स्थानावर घसरला. गोलंदाजांमध्ये इंग्लंडच्या आदिल रशीदने पाच स्थानांची प्रगती करत तिसरे स्थान पटकावले आहे. उपांत्य फेरीत भारताविरुद्ध आणि अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध त्याने चांगली कामगिरी केली होती. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि अंतिम फेरीतील सामनावीर ठरलेल्या सॅम करनने दोन स्थानांची प्रगती करत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT