Ravindra Jadeja number one all-rounder Ravindra Jadeja number one all-rounder
क्रीडा

ICC Test Ranking : रवींद्र जडेजा नंबर एक अष्टपैलू; रविचंद्रन अश्विन दुसऱ्यास्थानी

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) प्लेऑफ सामने सध्या भारतात सुरू आहेत. अशात आयसीसीने (ICC) नवीनतम क्रमवारी जाहीर (ICC Test Ranking) केली आहे. आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पुन्हा एकदा नंबर एकचा ऑलराउंडर बनला आहे. तर रविचंद्रन अश्विन नंबर दोनवर आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली हेही फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप दहामध्ये आहेत. (Ravindra Jadeja number one all-rounder)

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या जगातील नंबर एक कसोटी अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचे ३८५ गुण आहेत. त्याच्यापाठोपाठ रविचंद्रन अश्विनचे ​​३४१ गुण आहेत. आयपीएलमध्ये खेळणारा जेसन होल्डर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे ३३६ गुण आहेत. शाकिब अल हसन आणि बेन स्टोक्स हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

अष्टपैलू खेळाडूंव्यतिरिक्त गोलंदाजांच्या क्रमवारीवर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) दुसऱ्या तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या नंबरवर आहेत. पॅट कमिन्स पहिल्या तर शाहीन आफ्रिदी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर काइल जेमिसन आहे.

फलंदाजांच्या यादीत कर्णधार रोहित शर्माची चमक कायम आहे. विराट कोहलीचाही टॉप दहामध्ये समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन हा नंबर एकचा कसोटी फलंदाज आहे. भारताचा रोहित शर्मा ७५४ गुणांसह आठव्या तर विराट कोहली ७४२ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.

कसोटी (Test) संघाच्या क्रमवारीवरीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया १२८ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचे ११९ गुण आहेत. टीम इंडिया टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे तर एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT