England U19 vs India U19, Final Sakal
क्रीडा

U19 WC : India U 19 संघातील हे खेळाडू ठरवतील सामन्याचा निकाल

सुशांत जाधव

England U19 vs India U19, Final : भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचा फायनल सामना रंगणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. यंदाच्या हंगामात संघाने विक्रमी आठव्यांदा फायनल गाठली आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने 24 वर्षानंतर फायनल गाठली आहे. त्यांनी आतापर्यंत एकदाच वर्ल्ड कप जिंकला आहे. या आकडेवारीवरुन भारतीय संघाचे पारडे जड दिसते. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा असल्यामुळे इंग्लंडला कमी लेखून चालणार नाही. भारतीय संघाला पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी कर्णधार यश धूलसह अन्य काही युवांवर मोठी जबादारी असेल. जाणून घेऊयात कोणत्या खेळाडूवर असेल फायनल जिंकून देण्याची भिस्त....

यश धूल

भारतीय संघाचा कर्णधार यश धूलनं (Yash Dhull) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शतकी खेळी करुन संघाचा फायनलमधील प्रवास निश्चित केला. यश चौथ्या क्रमांकावर खेळायला येतो. परिस्थितीनुसार स्फोटक आणि संयमी खेळी करण्यात तो माहिर आहे. या स्पर्धेत शतकी खेळी करणारा यश धूल हा तिसरा भारतीय कर्णधार ठरलाय. याआधी 2008 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्यानंतर 2012 मध्ये उन्मुक्त चंदनं शतकी खेळी साकारली होती.

शेख राशीद

भारतीय संघाचा उप कर्णधार शेख राशीदनं सेमी फायनलमध्ये कर्णधाराच्या साथीनं द्विशतकी भागीदारी रचली होती. या सामन्यात त्याचे शतक अवघ्या 6 धावांनी हुकले. फायनलमध्ये अशीच संघासाठी उपयुक्त कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित आहे.

अंगकृष रघुवंशी

सलामीवीर अंगकृष रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) हा देखील भारतीय संघातील एक हुकमी एक्का आहे. यंदाच्या स्पर्धेत त्याने शतकही झळकावले आहे. युगांडा विरुद्धच्या लढतीत त्याने 120 चेंडूत 22 चौकार आणि चार षटकाराच्या मदतीने 144 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 405 धावा कुटल्या होत्या.

राज बावा

राज बावानं (Raj Bawa) युगांडा विरुद्धच्या लढतीत 108 चेंडूत 14 चौकार आणि 6 षटकारासह 162 धावांनी नाबाद खेळी केली होती. त्याने या सामन्यात केलेली वादळी खेळी

रवी कुमार

राजंद्रसिंह रवी कुमार (Ravi Kumar) याने आपल्या भेदक माऱ्यामुळे सर्वांनाच प्रभावित केले आहे. गोलंदाजी शैलीत आशिष नेहराची झलक दिसणाऱ्या रवीवर भारतीय गोलंदाजीची मदार असेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 37 धावाकरुन दोन तर क्वॉर्टर फायनलमध्ये 14 धावा खर्च करुन त्याने तीन विकेट घेतल्या होत्या.

निशांत सिंधू आणि विकी ओत्सवाल

निशांत आणि विक्की (Vicky Ostwal, Ravi Kumar and Vicky Ostwal) ही फिरकी जोडी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतना दिसली आहे. फायनल सामन्यातही या दोघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. या दोघांना साथ देण्यासाठी कौशल तांबेची भूमिका महत्त्वाची ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT