ICC U19 World Cup India vs South Africa Semi-Final Marathi News sakal
क्रीडा

Ind vs Sa U19 WC 2024 : 'फ्री'मध्ये बघा भारत-दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप सेमीफायनल; जाणून घ्या कधी, कुठे अन् कसा?

U19 WC 2024 IND vs SA : सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी, सामना येथे पहा फ्री

Kiran Mahanavar

ICC U19 World Cup India vs South Africa Semi-Final : अंडर-19 वर्ल्ज कप 2024 मध्ये भारतीय संघाचा सामना 6 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेशी होईल. भारतीय संघाने सुपर सिक्सच्या सामन्यात नेपाळचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता टीम इंडिया उपांत्य फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संघाने आतापर्यंत अंडर-19 वर्ल्ड कप 2024 मध्ये आपले सर्व सामने जिंकले आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी विलोमूर पार्क येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा थेट आनंद घेऊ शकता. याशिवाय, सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. जिथे तुम्ही सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता.

अंडर-19 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघ बांगलादेशसोबत पहिला सामना खेळला. टीम इंडियाने हा सामना 84 धावांनी जिंकला. यानंतर टीम इंडियाची आयर्लंडशी टक्कर झाली. या सामन्यात टीम इंडियाने 201 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यात अमेरिकेशी सामना झाला. या सामन्यात भारताने अमेरिकेचा 201 धावांनी पराभव केला.

चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना नेपाळशी झाला. भारताने हा सामना 132 धावांनी जिंकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT