ICC U19 World Cup Nishant Sindhu Tested Corona Positive  esakal
क्रीडा

ICC U19 WC: निशांत सिंधू कोरोना पॉझिटिव्ह, उपांत्यपूर्व फेरीला मुकणार

अनिरुद्ध संकपाळ

आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्डकप (ICC U19 World Cup) स्पर्धेत भारताच्या मागचे कोरोनाचे शुक्लकाष्ठ काही संपत नाही. भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू निशांत सिंधूला (Nishant Sindhu) कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो उपांत्यपूर्व फेरीतील बांगलादेश विरूद्धचा सामना खेळू शकणार नाही. असे असले तरी भारतासाठी एक दिलासादायक बातमी देखील आहे. भारताचा १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धूल (Yash Dhull) आणि उपकर्णधार राशीद (SK Rasheed) हे दोघेही कोरोनामधून सावरले असून ते बांगलादेश विरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहेत. याबाबतची माहिती एएनआयला सूत्रांनी दिली आहे. (ICC U19 World Cup Nishant Sindhu Tested Corona Positive Before Match against Bangladesh)

गेल्या आठवड्यात आर्यलंडविरूद्धच्या समन्यादिवशी बीसीसीआयने भारतीय संघातील चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. यात कर्णधार यश धूल आणि उपकर्णधार एस.के. राशीद या दोघांचाही समावेश होता. याचबरोबर अजून दोन खेळाडूंना लक्षणे दिसून आली होती. त्या सर्वांची आरटी - पीसीआर चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर सहा खेळाडूंना विलगीकरणात ठेवले होते. त्यामुळे आर्यलंड विरूद्धच्या सामन्यात भारताची बेंच स्ट्रेंथ खेळवावी लागली होती.

आज ( दि. २९ ) भारत आणि बांगलादेश (India U19 vs Bangladesh U19) यांच्यात सुपर लीगचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना होणार आहे. गतविजेत्या बांगलादेशने स्पर्धेत चांगली लय पकडली असून हा सामना अँटिग्वाच्या कूलीज क्रिकेट ग्राऊंडवर सायंकाळी ६.३० ला सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT