ICC Ranking Smriti Mandhana esakal
क्रीडा

ICC Ranking Smriti Mandhana : मोठी खेळी नाही तरी स्मृती फायद्यात; कर्णधार हरमनची मात्र मोठी घसरण

अनिरुद्ध संकपाळ

ICC Ranking Smriti Mandhana : बांगलादेश आणि भारतीय महिला क्रिकेट संघात सुरू असललेल्या वनडे मालिकेत पहिल्यात सामन्यात बलाढ्य भारतीय संघाला बागंलादेशने पराभवाचा धक्का दिला. या सामन्यानंतर आयीसीसने आज महिला वनडे रँकिंगची घोषणा केली.

या रँकिंगमध्ये भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाला फायदा झाला असून कर्णधार हरमनप्रीतच्या (Harmanpreet Kaur) रँकिंगमध्ये मात्र घसरण झाली आहे. स्मृती मानधनाला 704 रेटिंग पॉईंट्स मिळाले आहेत तर हरमनप्रीत कौरला 702 रेटिंग पॉईंट्स मिळाले आहेत. (ICC Women's ODI Ranking)

गोलंदाजीत डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड आणि अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मा या दोघी गोलंदाज आणि अष्टपैलू रँकिंगमध्ये पहिल्या 10 खेळाडूंमध्ये असलेल्या एकमेव भारतीय खेळाडू आहेत. या दोघींचीही रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. गायकवाड नवव्या तर दिप्ती सातव्या स्थानावर आहे.

वनडे बॅटर रँकिंगमध्ये श्रीलंकेची चामिरी अटापटूचे अव्वल स्थान फक्त दोन आठवडेच अबाधित राहिले. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने तिचे अव्वल स्थान हसकावले असून आता ती बॅटर रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाला गेल्या काही सामन्यांमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही.

मात्र तरी देखील तिच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली असून ती 704 रेटिंग पॉईंट्स घेत 6 व्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहचली आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरची मोठी घसरण झाली आहे. ती सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरली आहे. तिचे रँकिंग पॉईंट्स 702 झाले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT